Thursday, September 24, 2026
Latest NewsMAHARASHTRA

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

 

मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.

यामध्ये श्री.योगेश टिळेकर, श्रीमती.पंकजा मुंडे ,श्री.परिणय फुके, श्री.अमित गोरखे ,श्री.सदाभाऊ खोत , श्रीमती.भावना गवळी, श्री.कृपाल तुमाने, श्री.शिवाजीराव गर्जे,श्री.राजेश विटेकर,श्री.मिलिंद नार्वेकर, श्रीमती.प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading