Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

क्रेडच्या नवीन उत्पादनामुळे पैशांबाबत प्रावीण्य मिळवणे झाले सुलभ

 

पुणे : क्रेड या नियमित वापर करणाऱ्यांसाठी सर्वाधिक फायदा देणारा पेमेंट्स प्लॅटफॉर्म असून तो पैशांच्या व्यवस्थापनाच्या अनुभवात आमूलाग्र बदल करण्यासाठी सज्ज आहे. क्रेड मनी आर्थिक प्रगतीसाठी एक विश्वसनीय, बुद्धिमान आणि मदतशील मार्गदर्शक म्हणून वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन भीतीदायक न करता प्रेरणादायी करतो. काळ आणि संपत्तीसोबत पैशांच्या व्यवस्थापनाचा प्रशासकीय ताण खूप वाढतो. काही काळानंतर व्यवहार विविध खात्यांमध्ये विभाजित होतात. एक वृत्तपत्र सबस्क्रिप्शन, एसआयपी पेमेंट दुसरीकडे आणि अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करत राहण्याचा ताण असतो तो वेगळाच. कमी आत्मविश्वासाचे आर्थिक निर्णय- सर्वसामान्य ग्राहक दर महिन्याला असे २०० तरी निर्णय घेतो. त्यामुळे त्यांच्या आर्थिक ध्येयावर त्याचा प्रभाव पडतो आणि त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते.

भारतातील १० पैकी ७ सधन व्यक्ती विविध बँक खाती, वॉलेट्स आणि यूपीआय आयडीजमध्ये विभाजित फायनान्सेस वापरते. क्रेड मनीमुळे या बाबतीतील आर्थिक निर्णय प्रक्रियेतील विभाजन दूर होते. विविध बँक खात्यातील रकमा, व्यवहार आणि खर्च करण्याच्या पद्धती एकत्रितरित्या पाहता येतात. सदस्यांना अद्ययावत डेटा सायन्सचा लाभ होतो. प्रत्येक डेटा पॉइंट कार्यक्षम माहितीमध्ये रूपांतरित होतो आणि त्याचा वापर ते आपल्या आयुष्याचे चांगले नियोजन करण्यासाठी करू शकतात.

वारंवार होणारे पेमेंट्स- एसआयपी, ईएमआय, भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा विम्याचे हप्ते आर्थिक सुबत्ता वाढते तसे वाढत जातात. सदस्यांना आपल्या डोक्यात सतत तारखा, रकमा किंवा खात्यांचा विचार ठेवण्याची गरज पडत नाही कारण क्रेड मनी त्यांना रिमाइंडर्स, अपडेट्स आणि ऑफर्स सहजपणे पाठवते. त्यामुळे त्यांना क्रेड यूपीआयद्वारे लगेच पेमेंट करणे शक्य होते. क्रेड मनीसोबत फक्त क्रेडिट कार्ड बिल्स नाही तर प्रत्येक पेमेंट वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाच्या दिशेने एक महत्त्वाची बाब ठरते.

क्रेडचे संस्थापक कुणाल शाह म्हणाले की, “जितका जास्त पैसा, तितक्या जास्त समस्या. सधन वर्गासाठी पैशांचे व्यवस्थापन अनेकदा जास्त गुंतागूंत घेऊन येते. त्यामुळे चिंता निर्माण होते. आम्ही असे एक उत्पादन तयार केले आह, जे प्रत्येक सधन व्यक्तीचे पैशांसोबतचे नाते सुधारते आणि त्यांच्या चिंता एका विश्वासू, माहितीपूर्ण अनुभवाद्वारे कमी करते. क्रेड मनी अशा व्यक्तींसाठी आहे, ज्यांना आपल्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याचा त्रास न घेता पैशांवर जास्त नियंत्रण हवे आहे.”

अनेकदा ग्राहक विसरलेल्या गुंतवणूकीवरील आनंदाचे क्षण- लाभांश, पेमेंट रिव्हर्सल्स किंवा कर परतावा अनुभवत नाहीत. ते आता सहजपणे त्यावर लक्ष करून त्याचा अभ्यास करू शकतात. महत्त्वाचे अपडेट्सस सर्वांत महत्त्वाचे व्यवहार निर्माण करतात आणि नोटिफिकेशनचा थकवा दूर करतात.

खरोखर वैयक्तिक असलेले वैयक्तिक फायनान्स व्यवस्थापन क्रेड मनीची रचना अकाऊंट एग्रेगेटर (एए) फ्रेमवर्कवर केली गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकृत संस्थांदरम्यान आपल्या बँक खात्याची माहिती सुरक्षित आणि एनक्रिप्टेड संस्थांना देणे शक्य होते. एए फ्रेमवर्क हे भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेचा भाग आहे. त्याची रचना नागरिकांना आपल्या डेटाचे नियंत्रण करण्यासाठी केली गेली आहे.

क्रेड मनीसोबत सदस्यांना आपल्या बँक खात्याचे लॉगइन माहिती किंवा ताळेबंद न देता आपल्या आर्थिक पद्धती समजता येतात. क्रेड- एक अधिकृत आणि विश्वासू आर्थिक माहिती वापरकर्ता असून ते एका समृद्ध, वापरयोग्य आणि कार्यक्षम स्वरूपात सादर करते आणि त्यात कोणत्याही प्रकारचे मानवी हस्तक्षेप व ऑटोमॅटिक कॅटेगरायझेशन नसते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading