विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुशल प्रशासक व पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या आणि इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशीला गायके यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अहिल्याबाईंच्या २९९ व्या जयंतीचे औचित्य साधत सोशल स्टडी फाऊंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘Queen of Indomitable Spirit लोकमाता अहिल्याबाई होळकर’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरु प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, डॉ. सुनिल भंडगे आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
