मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा व्हिडीओ बघा! – चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. “मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…” असे खरगे म्हणत आहेत. यावरही संजय राऊतांनी यावरही भ्रष्टलेख लिहावा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
मागील काही दिवसांपासून उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करीत असून तथ्यहीन गोष्टी पसरवित आहेत. त्यावर एक्स समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करीत श्री बावनकुळे म्हणाले आहे की, संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात? आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा”.
https://x.com/cbawankule/status/1795364748382593057?t=EOWy2NQReUUCPlE7vBID_Q&s=08)
