fbpx
Sunday, June 16, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

मुंबई : पुणे अपघात प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी असे आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading