Wednesday, November 11, 2026
BusinessLatest News

कोटक लाइफकडून सात लाखांपेक्षा अधिक पॉलिसीधारकांसाठी  1,007 कोटी रुपयांचा बोनस जाहीर

मुंबई : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (कोटक लाइफ) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सात लाखांहून अधिक पात्र पॉलिसीधारकांना तब्बल १००७ कोटी रुपयांचा बोनस आज जाहीर केला आहे. सहभागी विमा योजनांवर कोटक लाइफतर्फे बोनस जाहीर केलेले हे सलग तेवीसावे वर्ष आहे.

कंपनीने आज घोषित केलेला बोनस हा आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या बोनस रकमेपेक्षा २० टक्के अधिक आहे.

कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालासुब्रमण्यम म्हणाले, “आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी सलग २३ व्या वर्षी वाढीव बोनस जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.  कोटक लाइफमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य निर्माण करण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहोत. हम हैं…हमेशा या ब्रँडच्या वचनाप्रमाणे आमच्या ग्राहकांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.”

Leave a Reply