Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अंदुरे, कळसकर यांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली होती. तब्बल दहा वर्षा नंतर या खटल्याचा निकाल लागला असून यामध्ये दोघांना दोषी थरविण्यात आले तर तिघांची निर्दोष  मुक्तता करण्यात आली आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात शनिवार पेठेत सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले असता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 
हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे. ५ पैकी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांवर गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. सचिन अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्यांना 5 लाख दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बोलताना सांगितले की, न्यायालयाचे निकालाचे आम्ही स्वागत करतो. या प्रकरणात २ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. जे निर्दोष सुटले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, असंही त्यांनी  म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading