Sunday, April 26, 2026
BusinessLatest News

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाला ग्रीन मॅन्‍युफॅक्‍चुरिंग वेअरहाऊससाठी मिळाले प्‍लॅटिनम रेटिंग; नवीन उद्योग मानक स्‍थापित

पुणे : स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) ला इंडियन ऑटोमोटिव्‍ह इंडस्‍ट्रीमध्‍ये ओनर-ऑक्‍यूपाय श्रेणीत प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) प्‍लॅटिनम सर्टिफिकेशन मिळणारी पहिली ऑटोमेकर म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या सन्‍मानामधून कंपनीने आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍यासाठी हाती घेतलेले सातत्‍यपूर्ण पर्यावरणास-अनुकूल उपक्रम दिसून येतात.

शाश्‍वतता लक्षात घेत निर्माण करण्‍यात आलेले चाकण, पुणे येथील स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाचे नवीन पार्ट्स एक्‍स्‍पीडिशन सेंटर व्हिएतनाममधील असेम्‍ब्‍लीसाठी सीकेडी पार्ट्सची निर्यात सुविधा देईल. काही प्रमुख उपक्रम आहेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी अधिकतम ओरिएण्‍टेशन, ऊर्जा-कार्यक्षम लायटिंग व इक्विपमेंट, जल संवर्धन, प्रभावी कचरा व्‍यवस्‍थापन आणि कर्मचा-यांमध्‍ये हरित मानसिकतेला चालना. प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल सर्टिफिकेशन मिळण्‍यासाठी कंपन्‍यांना त्‍यांच्‍या एकूण क्षेत्रांपैकी किमान १५ टक्‍के क्षेत्र ग्रीनरीसाठी प्रदान करावे लागते. आपल्‍या शाश्‍वत ध्‍येयांशी बांधील राहत एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलने कार्यरत क्षेत्राच्‍या क्षमतेबाबत तडजोड न करता जागेची बचत करणारे व्‍हर्टिकल गार्डन्‍स एकीकृत करत हे ध्‍येय साध्‍य केले. आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍यासाठी सेंटर अंतर्गत लॉजिस्टिक्‍स व कार्यसंचालनांकरिता इलेक्ट्रिक वेईकल्‍स व चार्जिंग स्‍टेशन्‍सचा वापर करते.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पियुष अरोरा म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या पुण्‍यातील केंद्रासाठी प्रतिष्ठित आयजीबीसी प्‍लॅटिनम प्रमाणपत्र मिळाल्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये शाश्‍वततेला प्राधान्‍य दिले जाते आणि या प्रमाणनामधून पर्यावरण संवर्धनाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ग्रुपचे छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र कार उत्‍पादनासाठी १०० टक्‍के ग्रीन एनर्जीचा वापर करते, तर पुण्‍यातील प्‍लांटमधील एकूण वापरापैकी जवळपास ३० टक्‍के ग्रीन एनर्जीचा वापर केला जातो. आमच्‍या केंद्रांमध्‍ये यासारख्‍या हरित उपक्रमांसह आम्‍ही शाश्‍वतता-केंद्रित ऑटोमोटिव्‍ह कंपनी म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करू.”

हे प्रमाणन एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलच्‍या पर्यावरणीय व ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या ‘गोटूझीरो’ ध्‍येयाला सन्‍मानित करते, ज्‍यामुळे कंपनीचा पर्यावरणावरील परिणाम कमी होतो. आपल्‍या कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजी २०३२ शी बांधील राहत एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलने आपल्‍या प्‍लांट्समध्‍ये नवीकरणीय ऊर्जा स्रोतांची अंमलबजावणी केली आहे आणि या प्रमाणामध्‍ये स्थिरगतीने वाढ करण्‍याची योजना आहे. आयजीबीसीकडून प्‍लॅटिनम रेटिंग सर्वोच्‍च प्रमाणन आहे आणि त्‍यामधून शाश्‍वतता निर्माण करण्‍यासाठी संपूर्ण प्रोजेक्टदरम्‍यान कंपनीचा शिस्‍तबद्ध दृष्टिकोन दिसून येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading