नरेंद्र मोदींच्या निवडक भाषणांचा संग्रह ‘नमो उवाच’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीत भाषांतर केलेल्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नमो उवाच’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या हस्ते आज करण्यात आले. राष्ट्रीय भाजप नेते सुनील देवधर यांनी संकलित केलेल्या आणि मराठीत भाषांतर केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचा संग्रह असलेले हे पुस्तक आहे.
पुणे लोकसभा बुथ प्रमुख व पदाधिकारी संमेलनासाठी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे पुणे दौऱ्यावर आहेत.
भाजप पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
..
फोटोओळ – नमो उवाचचे प्रकाशन करताना उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक. याप्रसंगी (डावीकडून) माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सुनील देवधर, शहराध्यक्ष धीरज घाटे, श्री. पाठक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले.
