अभाविपचे समाज कल्याण कार्यालयावर टोप्या टाका आंदोलन, सर्व मागण्या प्रशनासनाकडून मान्य..!
पुणे:: आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने समाजकल्याण कार्यालय, पुणे येथे ‘टोप्या टाका आंदोलन’ करण्यात आले.
MahaDBT या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या वेबसाईटवरील नव्याने आलेला ‘गिव्ह अप’ हा पर्याय चुकून निवडला गेल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागत आहे. ही समस्या फक्त पुण्यातील विद्यार्थ्यांची नसून महाराष्ट्रातील सर्व चुकून पर्याय भरलेल्या ८,००० विद्यार्थ्यांचा आहे. या विषयात ज्या विद्यार्थ्यांनी चुकून हा पर्याय निवडला हे जाणून घेण्यासाठी अभाविपकडून गूगल फॉर्म Circulate केला असता ३०० विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला. वेळोवेळी निवेदने देऊन देखील शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘टोप्या घालणाऱ्या’ या शासनाच्या विरोधात ‘टोप्या टाका आंदोलन’ समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी सह आयुक्तांची भेट घेतली असता सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. सर्व पीडित विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळेल व गिव्ह अप छा पर्याय रद्द करण्यातही समाज कल्याण विभाग राज्य शासनाकडे शिफारस करेल असे आश्वासन सह आयुक्तांनी दिले. ‘ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा त्याग करायचा आहे किंवा जे विद्यार्थी याचा लाभ घेऊ इच्छित नाहीत ते शिष्यवृत्तीसाठी अर्जच करणार नाहीत. असे विद्यार्थी वेबसाइट वर जाऊन ‘गिव्ह अप’ हा पर्याय निवडणे का पसंत करतील?’, असा प्रश्न अभाविप पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी उपस्थित केला.
ज्या विद्यार्थ्यांनी चुकून Give up चा पर्याय निवडला आहे. त्या विद्यार्थ्याना पुन्हा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, अशी ग्वाही उपायुक्तांनी दिली. तर ‘गिव्ह अप’ हा पर्याय चुकून निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म लवकरात लवकर Revert करावेत अथवा अभाविप संपूर्ण राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.
