Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

कार्तिकेयन एस यांची पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

पुणे:- कार्तिकेयन एस (भाप्रसे) यांनी डॉ. संजय कोलते (भाप्रसे) यांच्याकडून शनिवारी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्विकारला. महाराष्ट्र शासनाने कार्तिकेयन एस (भाप्रसे) यांची डॉ. संजय कोलते यांच्या जागी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत.
देशात पुणे स्मार्ट सिटीला एक रोल मॉडेल म्हणून पुढे नेऊ असे मत त्यांनी पदभार स्विकारल्या नंतर व्यक्त केला. यावेळी सौ. उल्का कळसकर मुख्य वित्त आधिकारी,पुणे स्मार्ट सिटी तथा सह आयुक्त लेखा व वित्त अधिकारी,पुणे महानगरपालिका, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान आधिकारी दिनेश वीरकर, कंपनी सचिव स्वानंद शेडे, उप अभियंता सुरेश बोरसे, कनिष्ठ अभियंता व इतर आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading