Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चर्चमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार 

अहमदनगर : मुलींच्या अंगात सैतान आहे, यामुळे तुमच्या मुलींवर संकट येवू शकते, असे सांगून सैतान काढण्यासाठी मुलींना चर्चमध्ये बोलावून चर्चच्या पास्टरने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथील सोनई गावाजवळ घडली आहे. धार्मिकस्थळी अशाप्रकारचे गैरकृत्य झाल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम वैरागर, संजय वैरागर आणी सुनील गंगावणे या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलींची कौटुंबिक परिस्थिती ही साधारण आहे. त्यांच्या गरीबीचा फायदा घेवून सोनई गावाजवळील चर्चच्या पास्टरने हे गैरकृती केले आहे. मुलींच्या अंगात सैतान आहे, यामुळे तुमच्या मुलींवर संकट येवू शकते, असे सांगून चर्चच्या पास्टरने पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षांच्या दोन मुलींना सोनई गावाजवळ असलेल्या चर्चमध्ये बोलावले. या दोघींना बोलावून आपल्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने आरोपीने मुलींवर आत्याचार केले. इतकेच नाही तर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यास आई व आजीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. गेल्या महिनाभरा पासून हा प्रकार सुरू होता. अखेर काल पिडीत मुलींच्या आईला हा प्रकार समाजाला, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली aahe.

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे घटना उघडकीस

गरिबीचा फायदा घेऊन धर्मांतर केले जात असल्याच्या अनेक घटना राज्यात घडत आहे. त्याच हेतूने हे गैरकृत्य घडले असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेचा दावा आहे. सदर घटना घडल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने हिंदुत्ववादी संघटनेकडे धाव घेतली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात धर्मांतराचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून धर्मांतर विरोधी कायदा केला जावा, अशी मागणी श्री राम संघाने केली आहे.

दरम्यान, अशा प्रकारेचे आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading