सोनालिकाने जानेवारी २०२४ मध्ये एकूण ९,७६९ ट्रॅक्टरची विक्री नोंदवली
पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्स हा जागतिक पातळीवर “भारताचे भूषण” ठरला असून आपल्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या माध्यमातून तो यशस्वीपणे ग्राहकांना सर्वोच्च समाधान आणि समृद्धी देत आहे. जानेवारी २०२४ मध्ये एकंदर ९,७६९ ट्रॅक्टरची विक्री करून एकंदर बाजारपेठेतील १५.६ टक्के वाटा हस्तगत करण्यात कंपनीला आनंद होत आहे. यासोबतच भारतीय ट्रॅक्टरच्या बाजारपेठेत विक्रीमध्ये वाढ नोंदविणारा तसेच उद्योगाची कामगिरी (-१४.८% अंदाजे) मागे टाकणारा हा एकमेव ब्रँड ठरला आहे.
समृद्धीच्या दिशेने नवीन मार्ग चोखाळण्यामध्ये शेतकरी कधीही मागे पडता कामा नयेत, याची सोनालिकाने नेहमीच काळजी घेतली आहे. सर्वात शक्तिशाली तरीही इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर, इंटेलिजंट फाईव्ह जी हायड्रॉलिक्स आणि सर्वाधिक मल्टी स्पीड ट्रान्समिशन पर्याय अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या श्रेणीत सातत्याने सुधार करत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या गरजा भागवून अधिक उत्पादकता मिळविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या रेंजवर पाच वर्षांची वॉरंटी देणे तसेच ट्रॅक्टरच्या किमती वेबसाईटवर प्रदर्शित करणे यांसारखी सुधारणात्मक पावलेसुद्धा कंपनीने उचलली आहेत. त्याचा कंपनीला खूप लाभही होत आहे.
याविषयी आपले मत व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, “शेतकऱ्यांच्या भूप्रदेशाच्या गरजानुसार विकसित केलेली शेतीची यंत्रसामुग्री ही भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेची काळाची गरज आहे. सोनालिकाचे प्रगत हेवी ड्युटी ट्रॅक्टर तसेच शेतकरीकेंद्रित उपक्रम यांचे एकमेव लक्ष्य आहे ते म्हणजे “शेतकऱ्यांची सर्वाधिक समृद्धी”. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांची प्रादेशिक गरज काहीही असली तरी त्यांच्या अत्यंत अनन्य गरजासुद्धा पूर्ण करण्यासाठी २०२४ मध्ये नवीन उत्पादने सादर करून पुढे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
