Thursday, September 17, 2026
BusinessLatest News

जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री ७ फेब्रुवारी पासून

मुंबई : जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (“बँक” किंवा “Jana SFB”) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी त्यांची प्राथमिक समभाग विक्री बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करेल.

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 6 फेब्रुवारी 2024 असेल. ऑफर बुधवार 7 फेब्रुवारी 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 9 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

प्रत्येक इक्विटी शेअर्ससाठी 393 रुपये ते 414 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून बोली किमान 36 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 36 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येऊ शकेल.

प्री-आयपीओ प्लेसमेंट अॅडजस्ट केल्यानंतर आणि विक्री समभागधारकांकडून (“ऑफर फॉर सेल”) (एकत्रितपणे “ऑफर”) 2,608,629 पर्यंतच्या इक्विटी समभागांच्या ऑफर फॉर सेल नंतर 4,620.00 दशलक्ष रु. इक्विटी शेअर्स (“फ्रेश इश्यू”) पर्यंतच्या फ्रेश इश्यूचा अंतर्भाव असलेल्या प्राथमिक समभाग विक्रीतून निधी उभारण्याची बँकेची योजना आहे. ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून (“कर्मचारी रिझरव्हेशन पोर्शन”) विक्रीसाठी 135.00 दशलक्ष रु. पर्यंतचे रिझरव्हेशन समाविष्ट आहे.

फ्रेश इश्यू मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर बँकेच्या भविष्यकालीन भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी बॅंकेच्या टियर 1 भांडवली आधार वाढविण्यासाठी, टियर 1 भांडवल आणि CRAR यांच्यात सुधारणा करण्यासाठी वापरण्याचा बँकेचा प्रस्ताव आहे. जोडीला, फ्रेश इश्यू मधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर ऑफर संबंधित खर्चासाठीही करण्यात येईल. (“ऑब्जेक्टस ऑफ द ऑफर”)

इक्विटी शेअर्स 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कर्नाटक येथील बंगळुरू येथे सादर केले जात आहेत (“ROC”).  या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर केले जात असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफर साठी बीएसई हे नियोजित स्टॉक एक्स्चेंज असेल.

अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ संज्ञांचा समान अर्थ RHP मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच असेल.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स 1957 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष पेक्षा जास्त आणि 1 दशलक्षा पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) दोन तृतीयांश भाग 1 दशलक्षापेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग आणि ऑफर प्राइस पेक्षा जास्त बोली असेल तर रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, पृष्ठ 550 वरील “ऑफर प्रक्रिया” पहा.

Click to access Jana-Small-Finance-Bank-Limited-RHP.pdf

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading