एचडीएफसी बँकेने पुण्यात फ्रॉड अवेयरनेस वर्कशॉपचे आयोजन केले
पुणे: एचडीएफसी बँकेने डिजिटल बँकिंग जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून, तरुण पिढीला सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी सुरक्षित बँकिंग वर्कशॉप आयोजित केली होती.
एचडीएफसी बँकेने रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च येथे फ्रॉड अवेयरनेस वर्कशॉपचे आयोजन केले होते. या संवादात्मक सत्राद्वारे, 250 हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल महत्वपूर्ण माहिती प्राप्त केली जेणेकरून ते सायबर फ्रॉडला बळी पडू नयेत.
वर्कशॉपमध्ये डिजिटल सुरक्षेची सर्वसमावेशक समज सुनिश्चित करून अनेक संबंधित विषयांचा समावेश करण्यात आला:
- आयएफएडब्ल्यू चा उद्देश: डिजिटल जागृतीसाठी इंटरनॅशनल फ्रॉड अवेयरनेस वीकच्या मिशन/भूमिकेशी उपस्थितांची ओळख करून देण्यात आली.
- सायबर फ्रॉड अवेयरनेस: वर्कशॉपमध्ये विशिंग, फिशिंग, स्मिशिंग, रिमोट डिव्हाईस ऍक्सेस, सिम स्वॅप आणि यूपीआय फ्रॉड यासारख्या सामान्य सायबर धोक्यांविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. फ्रॉडविषयी समजून घेण्यासाठी वास्तविक जीवनातील उदाहरणे सांगितली गेली.
- सुरक्षित नेटबैंकिंग और शॉपिंग टिप्स: सत्रांमध्ये सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांसाठी सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकण्यात आला, व्हिजिल आंटीचे महत्त्व अधोरेखित केले आणि सुरक्षित ऑनलाइन खरेदीसाठी अमूल्य टिप्स देण्यात आल्या.
- प्रतिबंधात्मक उपाय: उपस्थितांना ओटीपी, सीव्हीव्ही, डेबिट/क्रेडिट कार्ड पिन आणि यूपीआय पिन यांसारखी संवेदनशील माहिती कोणालाही न देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
मनीष अग्रवाल, एक्झिक्युटीव्ह वाइस प्रेसिडेंट – क्रेडिट इंटेलिजन्स अँड कंट्रोल – एचडीएफसी बँक यावर टिप्पणी करताना म्हणाले, “आजची तरुण पिढी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक व्यवहार करत आहे, त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि ऑनलाइन फ्रॉडला बळी पडू नयेत यासाठी त्यांनी अवलंबलेल्या सुरक्षित बँकिंग पद्धतींबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी गोपनीय बँकिंग डेटा कोणाशीही शेअर करू नये किंवा अनव्हेरीफाईड लिंकवर क्लिक करू नये. लहान वयातच सहभागींमध्ये सुरक्षित बँकिंगची सवय लावणे हा या सत्राचा उद्देश होता.”
चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 24), एचडीएफसी बँकेने भारतभर अशी 6,200 हून अधिक सत्रे आयोजित केली आहेत आणि समाजातील विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या 79,000 हून अधिक सहभागींपर्यंत पोहोचले आहे. या वर्कशॉपचा उद्देश शाळा, महाविद्यालये, ग्राहक, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, ज्येष्ठ नागरिक, स्वयं-सहायता गट, शैक्षणिक संस्था, विक्रेते, भागीदार आणि कर्मचाऱ्यांना शिक्षित करणे हा आहे.
बँक ग्राहकांना डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्यास आणि सुरक्षित बँकिंग सवयी अंगीकारण्यास आणि त्यांची गोपनीय बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करू नये यासाठी प्रोत्साहित करते. जर एखादा ग्राहक फसवणुकीला बळी पडला, तर त्यांनी त्वरित त्यांच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा आणि 1930 (नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलद्वारे हेल्पलाइन नंबर) वर कॉल करावा.
