Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

संगीत उत्तर रामायण कार्यक्रम येत्या ६ जूनला


पुणें : प्रसिद्ध कवी व गीतकार अशोक जोशी (कुमुदाग्रज) यांच्या रचनांवर आधारित संगीत उत्तर रामायण या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन लव्हबर्डस पब्लिकेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम शनिवार, दिनांक ६ जून रोजी मयूर कॉलनी येथील बालशिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या काळात  संपन्न होईल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

संगीत उत्तर रामायण या सांगीतिक कार्यक्रमात धनंजय म्हसकर, सुवर्णा राठोड, कौस्तुभ दातार, वैष्णवी भालेराव आदी कलाकार सहभागी होतील. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी करतील. वादक अपूर्व द्रविड, विनीत तिकोणकर, आदित्य आपटे, निलेश देशपांडे, प्रसन्न बाम असून संगीत संयोजन केदार परांजपे यांचे आहे.

राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. प्रसिद्ध संगीतकार केदार पंडित व लेखक अभिजित जोग यांची देखील कार्यक्रमास उपस्थिती असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading