Monday, June 22, 2026
BusinessLatest News

पूनावाला फिनकॉर्पने एक नवीन मोहीम सुरू केली आहे:  “लोग तो सवाल करेंगे ही” 

पुणे: पूनावाला फिनकार्प लिमिटेड, या सायरस पूनावाला कंपनीद्वारे स्थापित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने ‘लोग तो सवाल करेंगे ही’ ही डिजिटल मोहीम सुरू केली आहे. चांगली क्रेडीट वर्तणूक आणि उच्च क्रेडीट स्कोअर असूनही लोक उच्च व्याजदराने कसे कर्ज घेतात व उच्च ईएमआय भरतात यावर, पूनावाला फिनकॉर्प या नवीन मोहिमेद्वारे प्रकाश टाकते. ही मोहीम उच्च क्रेडीट स्कोअर असलेल्या कर्जदारांना परवडणाऱ्या व्याज दरासह पूनावाला फिनकॉर्पच्या अडचणमुक्त कर्जाचे ऑफर्स देण्यासाठी, इतर फायदे शोधण्यासाठी आणि त्यांनी उच्च व्याजाची कर्जे पूनावाला फिनकॉर्पला हस्तांतरित करण्याचा विचार करण्यासाठी लक्ष्यित आहे. कर्जदार कोणत्याही शुल्काशिवाय पूनावाला फिनकॉर्पसह त्यांचे क्रेडीट स्कोअर देखील तपासू शकतात. 

या मोहिमेमध्ये दोन छोटे आगळे-वेगळे आणि विनोदी लघुपट आहेत, ज्यांनी पूनावाला फिनकॉर्पच्या वेबसाइट, मोबाइल ॲप्लिकेशन किंवा कॉल सेंटर प्लॅटफॉर्म्सद्वारे उच्च क्रेडीट स्कोअर असलेल्या लोकांना कमी व्याजदरात झटपट आणि अडचणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेबद्दल जागरूकता निर्माण केली आहे.

 

‘लोग तो सवाल करेंगे ही’ मोहिमेतील लघुपट पाहण्यासाठीच्या लिंक्स:   

 

पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा म्हणाले, “सणासुदीच्या काळात ग्राहक कर्जाच्या मोठ्या मागणीच्या प्रवृत्तीला घराचे नुतनीकरण, सुट्ट्या, लग्नसोहळे किंवा ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी इत्यादी अनेक कारणांमुळे चालना मिळते.

आम्ही असे निरीक्षण केले आहे की सणासुदीच्या काळात चांगला क्रेडीट इतिहास आणि उच्च क्रेडीट स्कोअर असूनही लोकं योग्य लक्ष न घालता उच्च व्याजाची कर्जे घेतात ज्यामुळे उच्च ईएमआय भरण्याचा अनावश्यक भार निर्माण होतो. या मोहिमेचा उद्देश पूनावाला फिनकॉर्पसारखा, कर्जदाराला कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय आकर्षक व्याजदरावर सर्वोत्तम कर्ज ऑफर शोधण्यात मदत करू शकणाऱ्या योग्य कर्ज सेवा प्रदाता कसा निवडायचा याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. पूनावाला फिनकॉर्पमध्ये आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकाच्या आर्थिक गरजा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम ग्राहक-केंद्रित उत्पादने आणि उपाय ऑफर करण्यात विश्वास ठेवतो. ही मोहीम उच्च क्रेडीट स्कोअर असलेल्या ग्राहकांना झटपट अडचणमुक्त कर्ज देण्यासाठी वचनबध्द असलेली, सर्वात पारदर्शक आणि एंड-टू-एंड डिजिटल कर्ज देणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) असण्याच्या आमच्या मूल्याच्या प्रस्तावावर प्रकाश टाकते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading