Sunday, July 26, 2026
Latest NewsPUNE

उत्साहपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पुणे : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चा जयघोष करीत अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. भव्य विश्वगुरु रथात विराजमान होऊन तमाम मंडईकरांचे श्रद्धास्थान असणारे शारदा गजानन बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पांचाळेश्वर मंदिर घाट येथे गणपतीचे विसर्जन झाले.

मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३० वे वर्ष आहे. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारा वादन आणि त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह आणि नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्ट मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्वामी समर्थांची १० फूट उंचीची मूर्ती असलेला विश्वगुरु रथ गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होता.

रथावर श्री दत्त महाराजांचे थ्री डी पेंटींग साकारण्यात आले होते. कर्दळी वनात वाळूतून प्रगट झालेले स्वामी अशी सजावटीची संकल्पना होती. हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने कर्दळी वनातून प्रगट होणारे स्वामी हे दृश्य पाहणे हा उपस्थित भाविकांसाठीचा वेगळा अनुभव होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading