डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह
पुणे : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप ) या आघाडीच्या एफएमसीजी समूह आणि बहुव्यवसायिक कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडपैकी एक असलेल्या पल्स कँडी कडून महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी गणेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ या व्यापक ब्रँड संकल्पनेला पुढे नेत हा उत्सव साजरा केला जात आहे.
महाराष्ट्रभर गणपती उत्सवाला लाभलेली सामूहिक भावना, परंपरा आणि भक्ती यांना केंद्रस्थानी ठेवत पल्स कँडीने गेल्या काही वर्षांत आपल्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेत सातत्याने नवनवीन उपक्रमांची भर घातली आहे. ग्राहकांचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण अनुभव निर्माण करण्याबरोबरच उत्सवाच्या मूळ भावनेशीही ब्रँडने सातत्याने नाते कायम ठेवले आहे. ही मोहीम १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव या प्रमुख बाजारपेठांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या व्यापक संकल्पने अंतर्गत ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ या मोहिमेद्वारे नाविन्यपूर्ण अनुभवाची ही परंपरा पुढे नेण्यात येत आहे. या उपक्रमात भक्तांना परस्परसंवादी आणि मूषकावर आधारित अनुभवाच्या माध्यमातून बाप्पाला वैयक्तिक स्वरूपात डिजिटल अर्पण करण्याची संधी मिळणार आहे.
भक्तीची शाश्वत भावना, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा सहभाग यांचा संगम साधत हा उपक्रम पारंपरिक भक्तीला आधुनिक स्वरूप देतो. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने प्रत्येक भक्ताला स्वतःच्या इच्छेनुसार बाप्पाला अर्पण करता येणे अनेकदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ ’ या उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना बाप्पाला वैयक्तिक डिजिटल अर्पण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भक्ताने आपले अर्पण तयार केल्यानंतर घंटानाद होतो आणि भगवान गणेशांचे दिव्य दूत असलेला मूषक विविध आकर्षक दृश्यरूपांमध्ये प्रकट होऊन भक्ताने निवडलेले अर्पण बाप्पा पर्यंत पोहोचवतो. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी पडद्यावर अर्पण पूर्ण झाल्याची पुष्टी केली जाते. त्यामुळे भक्तांसाठी हा एक संस्मरणीय आणि वैयक्तिक अनुभव ठरतो.
या विशेष अनुभवात आणखी एक अर्थपूर्ण भर म्हणून सहभागी ग्राहकांना पल्स कँडी चे पाकीट आणि ब्रँडेड, लागवड करता येणाऱ्या बियांच्या कागदापासून तयार केलेले कार्ड प्रतीकात्मक आशीर्वाद म्हणून देण्यात येणार आहे.
व्हाट्सअप च्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या ग्राहकांना वैयक्तिक स्वरूपातील गणपती शुभेच्छा संदेशही प्राप्त होणार असून, त्यामुळे डिजिटल अनुभवाला आणखी व्यापक स्वरूप मिळणार आहे.
याशिवाय, मोहिमेच्या मायक्रो साइटवर उपलब्ध असलेल्या डिजिटल अर्पणाच्या अनुभवाच्या माध्यमातूनही ग्राहकांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ग्राहक कुठूनही या मोहिमेचा भाग बनू शकतात.
या मोहिमेबद्दल बोलताना, डीएस (DS) ग्रुपच्या कन्फेक्शनरी विभागातील मार्केटिंगचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आशिष भार्गव म्हणाले, “गणेश महोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या उत्सवामागील भावना, भक्ती आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आम्ही डीएस ग्रुप मध्ये मनापासून समजून घेतो. सलग पाचव्या वर्षी लालबागचा राजा यांच्याशी जोडले जाणे हा ब्रँडसाठी अभिमानाचा क्षण असून, ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे.
पल्स कँडी साठी अशा सांस्कृतिक क्षणांमधून ‘प्लस ऑफ इंडिया’ ही व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते. भारताला वैशिष्ट्यपूर्ण बनविणाऱ्या विविध भावना, परंपरा आणि अभिव्यक्तींचा उत्सव साजरा करणारे हे व्यासपीठ आहे. सण-उत्सव आणि प्रादेशिक परंपरांपासून ते लोकांना एकत्र आणणाऱ्या दैनंदिन क्षणांपर्यंत, ‘प्लस ऑफ इंडिया’च्या माध्यमातून आम्हाला देशाशी अस्सल, संबंधित आणि विशिष्ट प्लस अनुभवाच्या माध्यमातून जोडले जाण्याची संधी मिळते.
