Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

माजी मंत्री मदन बाफना यांचे निधन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा वडगाव मावळ येथील रहिवासी श्री. मदनजी हरकचंदजी बाफना ( वय वर्ष ८७) यांचे अल्पशा आजाराने आज, सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

श्री. मदनजी बाफना यांनी १९८५ ते १९९५ या कालावधीत दहा वर्षे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात योगदान दिले. १९८७ ते १९९२ या काळात त्यांनी महसूल तसेच विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांचे ते निकटवर्तीय सहकारी म्हणूनही परिचित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

त्यांचे अंत्यदर्शन उद्या, मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बाणेर येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच ९ ते १२ वाजेपर्यंत हरकचंद रायचंद बाफना डी एड कॉलेज येथे दर्शना साठी व दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत त्यांच्या निवास स्थानी , वडगाव मावळ येथे ठेवण्यात येणार आहे आहे.

त्यानंतर उद्या दुपारी ४ वाजता वडगाव मावळ येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस प्रारंभ होऊन ती वडगाव स्मशानभूमी येथे जाईल.

श्री. मदनजी बाफना यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बाफना कुटुंबीयांवर तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य हितचिंतकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply