सतिश मुंदडा यांना राज्य कर सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती
मुंबई – शासनाने नुकतेच राज्य कर विभागातील कर्मचार्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. विभागातील एकूण 19 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. यात परभणीचे भूमिपुत्र व सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले सतिश मुंदडा यांची राज्य कर सहाय्यक आयुक्तपदी (Assistant Commissioner of State Tax) पदोन्नती करण्यात आली आहे.
शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशात सतिश मुंदडा यांना राज्य कर सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. सतिश मुंदडा हे सध्या माझगाव, मुंबई येथे राज्य कर विभागात विक्रीकर अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. आता त्यांची ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील राज्य कर आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
मुंदडा हे मुळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांच्या या पदोन्नतीमुळे त्यांचे उपायुक्त श्री. शर्मा, सहाय्यक आयुक्त श्री. सिद्धार्थ मोरे, यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व गावकऱ्यांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.