Saturday, April 4, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मधुरा वाघ आणि सीमा शर्मा ठरल्या मानकरी

पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत २९ ते ४० वर्षे वयोगटात  मधुरा वाघ  ४१ ते ५१ वर्षे वयोगटात सीमा शर्मा  या मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मानकरी ठरल्यातसेच२९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा बुटाला आणि घनाक्षी लोंढे  आणि ४१ ते ५१ वर्षे वयोगटात रोहिणी टिळक आणि सारिका गांधी या रनर अप ठरल्यामिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य,व्यक्तिमत्व  बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडलीया स्पर्धेचे उद्घाटन मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे,संयोजिका अॅड अमृता जगधने,परीक्षक नृत्य दिग्दर्शक ओंकार शिंदेप्रचिती पुंडेरविबाला काकतकर आणि सारिका शेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.  पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ग्रुमिंग मेंटोर जुई सुहास यांनी विजेत्या महिलांना मुगुट प्रदान केलेयाप्रसंगी मुख्य समन्वयक अॅडअभय छाजेडपदाधिकारी अतुल गोंजारीमोहन टिल्लूश्रीकांत कांबळे हे उपस्थित होतेकार्यक्रमाचे निवेदन प्रतीक कदम यांनी केलेया कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती.


या स्पर्धेत २९ ते ४०  ४१ ते ५१ वर्ष असे दोन वयोगट होते१४०हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होतायाची प्राथमिक निवड स्वपरिचय  प्रेझेंटेशनवरून केली  त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १०व दुसऱ्या गटात १०अशा २०महिलांची निवड करण्यात आलीत्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले गेले  त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतले गेले.


आज स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय  नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोऱ्या गेल्या.यातून  महिलांची निवड करण्यात आलीयातून एक विजेती  दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटातून करण्यात आलीरविबाला काकतकरप्रचिती पुंडेओंकार शिंदे  आणि सारिका शेठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


या कार्यक्रमात गणेश वंदना कलाकृती डान्स अकादमी तर्फे करण्यात आलीयाचे नृत्यदिग्दर्शन अदिती केळकर यांनी केलेसांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  सुरज डान्स अकादमीने   ‘बाई पण भारी देवा’ गाण्यावर नृत्य केले  तर धनश्री जोगळेकर यांनी सरगम हे  कथ्थक केले.


या स्पर्धेतील महिलांचे ग्रुमिंग ‘मिसेस महाराष्ट्र शुभांगी पाटील यांनी केलेया स्पर्धेचे संयोजन अॅड.अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे  आशुतोष जगधने यांनी केलेया कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी  ब्लेझ अकॅडमी होते  तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या होत्या.


३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशनपंचशीलसुमा शिल्प, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेतभारत फोर्जकुमार रिअॅलीटीआहुरा बिल्डर्सबढेकर ग्रुप आणि  सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading