युनिक प्रॉस्पेरो येथे गणेशोत्सव उत्साहात सुरु
पुणे : पोरवाल रोड येथील लोहेगाव परिसरात, युनिक प्रोस्पेरो ही आकर्षक सोसायटी आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकूण ७९ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. सोसायटी गो ग्रीन उपक्रम राबवण्यात अग्रगण्य असून परिसरातील सर्व झाडांची योग्य काळजी घेण्यात यशस्वी ठरली आहे. तसेच पहिल्या दोन वर्षामध्येच सोलर प्लँट बसवून विजेची बचत व पर्यावरण पूरक उपक्रम सोसायटी तर्फे यशस्वीपणे राबविण्यात आलेले आहेत.
सोसायटीच्या गणपती उत्सवाचे हे सलग चौथे वर्ष आहे. यंदा चंद्रयान मोहिमेचा आकर्षक देखावा सादर करण्यात आलेला आहे.
सर्व सोसायटी कमिटी सदस्य व स्थायिक नागरिक यामध्ये सहभाग घेऊन गणेशोत्सव साजरा करतात. या निमित्ताने सोसायटीतील सर्व आभार वृद्ध एकत्र येऊन आनंद घेतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तंबोला, गायन, नृत्य, रांगोळी व इतर अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.सत्यनारायण व महाप्रसादाने सांगता केली जाते. मराठी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा करण्यात आहे. सोसायटी तील कामगार वर्ग देखील आनंदाने सर्व कामे करून आपला बहुमोल सहभाग उत्सव यशस्वी करण्यासाठी समर्पित करतात. यावर्षी देखील सोसायटीचे चेअरमन संतोष उत्तेकर, श्रीकांत वहिले, श्रेयश व श्रेया कांबळे, नवीन खंडेलवाल, निलेश दानी, आशुतोष श्रीवास्तव, नितीन पोवार, विनीत कुलकर्णी, शांन्मुक संचेती व इतर समिती सदस्य व सोसायटीतील रहिवासी यांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले आहे. पर्यावरण रक्षणाची जनजागृती उपक्रमासाठी सोसायटी सातत्याने कार्यरत आहे.
