Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

श्रीकृष्ण मित्र मंडळाचा गणेशोत्सवानिमित्त अनावश्यक खर्च टाळून परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा विधायक उपक्रम

पुणे – येरवड्यातील श्रीकृष्ण मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त अनावश्यक खर्च टाळून परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा विधायक उपक्रम गणरायाच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राबवला. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निखिल गायकवाड यांच्या हस्ते मंडळाच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे म्हणाले, आम्ही गणेश उत्सवानिमित्त मंडळांना विधायक उपक्रम राबवावेत अशी सूचना केली होती. येरवडा गावठाण येथील श्रीकृष्ण मित्र मंडळ यांनी गणेशोत्सवा मधील अनावश्यक खर्च टाळून परिसराच्या सुरक्षेसाठी मंडळाचा खर्चातून दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श उपक्रम राबविला आहे. परिसराची सुरक्षितता राखण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. इतर गणेश मंडळांना देखील याचा आदर्श घेऊन आपल्या परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सीसीटीव्ही यंत्रणेचे काम करणारे रुद्र इंटरप्राईजेसचे कपिल सोनवणे यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक हनीफ शेख, उद्योजक अजीमभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते शैलेश राजगुरू, अन्वर शेख यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष केतन गावडे यांच्यासह सागर जगधने,प्रतीक जगधने,योगेश गावडे, अभिजीत गावडे, प्रणव गावडे,अनिकेत घाडगे,गौरव जगधने,संतोष जायकर,अमित घाडगे,ओमकार ससाणे, अंकुर ससाणे इरफान सय्यद, गणेश पवार, शुभम शिंदे, परशु जाधव, प्रिन्स बोर्डे उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश ढेरे यांनी केले आभार दिनेश काटकर यांनी मानले. यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित पोलीस अधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आगामी काळात देखील मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading