‘गो कलर्स’चे पुण्यात नवे स्टोअर सुरू
पुणे : आघाडीचा फॅशन ब्रँड गो कलर्सने औंध येथे नवे सुरू केले आहे. गो कलर्स ब्रँडचे हे शहरातील ४४ वे स्टोअर आहे. या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर ग्राहक उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात उपस्थितांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी गो कलर्सने फॅशन आणि लाइफस्टाइलविषयी कंटेंट तयार करणाऱ्या २० मान्यवरांना आमंत्रित केले होते. त्यांनी या कार्यक्रमात आपले अनुभव, टीप्स सांगून उपस्थितांचे मन जिंकले.
या नव्या स्टोअरमध्ये गो कलर्सची ओळख असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या सर्वोत्कृष्ट उत्पादनांची विस्तृत श्रेणी पाहायला मिळते. सर्व वयोगटातील महिलांसाठी येथे ट्रेंडी लेगिंग्जपासून स्टायलिश जेगिंग्जसह अनेक वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध आहेत. ‘पुण्यात आमचे ४४ वे स्टोअर उघडणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. सुरुवातीपासून, आम्ही वैविध्यपूर्ण उत्पादनांच्या साह्याने बॉटमवेअरमधील एक उत्तम ब्रँड म्हणून विकसित झालो आहोत. आम्ही आमच्या प्रिय ग्राहकांसाठी नवनवीन शैलीतील उत्पादने आणून आमचा प्रवास वैशिष्ट्यपूर्णरितीने सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत’, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम सरोगी म्हणाले.
गो कलर्सचे औंधमधील आयटीआय रोड येथील नवे स्टोअर फॅशनप्रेमींसाठी आनंददायी खरेदीचा अनुभव घेण्याचे एक उत्तम ठिकाण आहे.
