fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsPUNE

परम दयाल परमप्रेममय युगपुरुषोत्तम श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांचा 136 वा अविर्भाव दिवस उत्साहात साजरा

पुणे : महाळुंगे नांदे रस्ता, महाळुंगे स्थित सत्संग विहार पुणे येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी परम दयाल परमप्रेममय युगपुरुषोत्तम श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांचा 136 वा अविर्भाव दिवस धुमधडाक्यात व अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला.

14 सप्टेंबर 1888 ला पूर्व बंगालमध्ये पाबना जिल्ह्यामध्ये हिमायतपूर येथे अविर्भाव झालेले श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र हे या युगातील अध्यात्मिक गुरु, सद्गुरु व पुरुषोत्तम असून त्यांनी बालपणापासूनच त्यांच्या सगळ्या प्रकारच्या लीलांमधून समस्त मानव जातीला दुःखातून व अंधकारातून बाहेर निघून स्वतःचे वैयक्तिक जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगावे व त्यासोबतच स्वतःचे कुटुंबाचे पारिपाश्विकचे, समाजाचे, राज्याचे, देशाचे व विश्वाचे अध्यात्मिक उन्नयन कसे करावे याचा मार्ग स्वतःच्या जीवनातून स्वतःला आदर्श व इष्ट प्रतिष्ठापित करून दाखवून दिला व संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचले.

तर असे इष्ट, आदर्श व दयाळू श्री श्री ठाकूर यांचा 136 वा अविर्भाव दिवस त्यांच्याच पुणेस्थित भक्त लोकांनी पहाटे पाच वाजल्यापासून उषा कीर्तन पासून सुरुवात करून सूर्योदयाला सकाळी सहा वाजून 21 मिनिटांनी समवेत विनंती प्रार्थना व सात वाजून पाच मिनिटांनी श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र यांच्या जन्म वेळे वर 136 वेळा त्यांचाच जयजयकाराच्या घोषणा व तसेच दिवसभरात मग नामवंत वक्तांच्या श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र यांच्या जीवन दर्शन वर आधारित परिसंवाद, दीक्षा पत्र कार्य, ऑनलाईन ईस्टभृती तसेच दुपारच्या प्रसादानंतर विविध स्त्री पुरुष भक्तांचा सहभाग असलेली संगीतांजली, महिला भक्तांनी आयोजित केलेले सत्संग (मातृसंमेलन), मुलांकरिता विविध उपक्रमाद्वारे कार्यक्रम, ग्रामस्थ शाळेत मुलांना उपयोगी पडणारे खेळ सामग्रीचा वाटपं, वरिष्ठांचे सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता बोरज ग्राम तालुका मावळ येथील भक्तांच्या ढोल ताशा समवेत म्हाळुंगे नांदे रोडवर मिरवणूक व त्यानंतर संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी समवेत विनती प्रार्थना व सोबत जोडून 500 अपेक्षा जास्तच भक्तांच्या उपस्थितीत भव्य सत्संग व त्यानंतर रात्री विविध प्रकारची रोषणाई व सगळ्या भक्तां करिता प्रसादाचे वाटप यासह कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.  

Leave a Reply

%d bloggers like this: