‘भारता’ च्या विकासात चेतना फुलविण्यासाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे “स्वदेश बँकींग” उपक्रम
मुंबई : भारतातील अग्रगण्य एसएफबी असलेली एयू स्मॉल फायनान्स बँक अतिशय अभिमानाने “स्वदेश बँकिंग” हा अत्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम सादर करत आहे. बँकेचा हा नवीन आविष्कार ग्रामीण भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणणारा अग्रगण्य उपक्रम ठरणार आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेला (AU SFB) आर्थिक समावेशनाचा प्रदीर्घ वारसा तसेच ग्रामीण आणि निम-शहरी बाजारपेठेचे सखोल ज्ञान आहे. या सर्वाला शेतकरी, स्वयंरोजगारीत कर्मचारी, इंडियाच्या भारतातील सूक्ष्म उद्योजक या घटकांसाठी सर्वदृष्टीकोनातून व्यापक आणि सर्वसमावेशक उपायांची उत्तम जोड लाभलेली आहे आणि या सर्वांचा एकत्रित लाभ घेण्यासाठी स्वदेश बँकिंगरुपी नवीन उपक्रम बँकेतर्फे धोरणात्मकरित्या आखण्यात आला आहे.
आर्थिक आणि डिजिटल समावेशकतेला चालना देण्यासाठी एयू एसएफबीची वचनबद्धता अतूट आहे. या अतूट वचनबद्धतेतूनच आर्थिक सेवेच्या परिघापासून वंचित असलेल्या समुदायांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच ग्रामीण भाग तसेच वित्तीय सेवेपासून कोसोदूर असलेल्या भागांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बँक समर्पित आहे. ‘स्वदेश बँकिंग’ सुरू केल्यामुळे, एयू एसएफबीला त्यांच्या ग्रामीण शाखा, बँकिंग आउटलेट्स, बँकिंग संपर्क प्रतिनिधी, वित्तीय आणि डिजिटल समावेशन करणारे युनिट, आणि लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना (एसएमएफ) कर्ज देणारी युनिट्स बँकेच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी एका छत्राखाली त्याचबरोबर एका नेतृत्वाअंतर्गत आणणे अतिशय सहजसोपे ठरणार आहे.
ग्रामीण भागाच्या आगळ्यावेगळ्या गरजा पूर्ण करणे आणि त्याच्यासमोरील आव्हांनाचा मुकाबला करण्यासाठी स्वदेश बँकींगमुळे व्यापक लक्ष केंद्रीत होणार आहे. तसेच ग्राहकाभिमुख बँकींग उत्पादने , सेवा तसेच कार्यपध्दतीची अंमलबजावणीसुध्दा होणार आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि स्थानिक दुकानदारास ज्यांना सूक्ष्म उद्योजक म्हणून संबोधित केले जाते, अशा घटकांना विस्तारित डिजीटल पर्याय सादर केले जाणार आहे. यातून वित्तीय साक्षरता वाढणे, डिजीटल समावेशन होणे, स्थानिक उद्योगाना विशेष बँकींग उत्पादनांचा पुरवठा आणि गाव पातळीवर आर्थिक वाढीला हातभार लागणार आहे.
डिजीटल भारताच्या स्वप्नाला पाठबळ देताना एयू एसएफबीने ग्रामीण भागात बँकीग सेवा सहजपणे उपलब्ध होण्याकरिता विशेष जोर दिला असून त्यासाठी ग्राहकांना सहजपणे वापरता येणाऱ्या डिजीटल मंचामध्ये व्यापक प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. बँकेचे मोबाईल अॅप, इंटरनेट पोर्टल्स आणि नाविन्यपुर्ण व्हिडीओ बँकींग सेवेने केवळ बँकेचे कामकाज आणि व्यवहारात सहजसुलभता आणि उपलब्धताच आणलेली नाही, तर वैयक्तित असे संबंधही प्रस्थापित केले आहेत. गेल्या एका वर्षात, ग्रामीण आणि निमशहरी भागात केवळ व्हिडीओ बँकींगच्या माध्यमातून तब्बल 66 हजारांपेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी 92 हजारांपेक्षा अधिक व्हिडीओ कॉल्स करण्यात आलेले आहेत.
ग्रामीण पातळीवर सामाजिक बदल घडवून आणणारी एक परिवर्तित शक्ती म्हणून एयू स्मॉल फायनान्स बँक उदयास आली आहे. प्राधान्य क्षेत्रासाठी 94 टक्के कर्जपुरवठा करत बँकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे आणि या कर्जपुरवठ्यातील 62 टक्के कर्ज हे 25 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. तसेच बँक सेवांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागात 31 टक्के बँक संपर्ककेंद्र प्रस्थापित करत नियमावलीतील निर्धारित उद्दीष्टांपेक्षा अधिक उद्दीष्ट साध्य केले आहे. निर्धारित उद्दीष्ट पूर्ण करण्याचे कामच केवळ एयू स्मॉल फायनान्स बँक करत नाही, तर भारतातील ग्रामीण आणि निमशहरी भागाचे वित्तीय समावेशकतेच्या कार्यातसुध्दा आघाडीवर आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या राजस्थानातील विस्तारामागील खरीखुरी ताकद असलेले मास्टर जी सुलतान सिंग पलसानिया यांनी स्वदेश बँकींच्या राष्ट्रीय प्रमुखपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. बँकेच्या व्यापक वित्तीय सेवाच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी भागात लक्षणीय परिणाम घडवून आणण्याची जबाबदारी या पदाच्या माध्यमातून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय स्वदेश बँकींग, सरकारी व्यवसाय, घाऊक मुदतठेवी संकलन आणि सहकारी बँकिंगचे एकत्रीकरण करत बँकेत अधिक समन्वय वाढवण्याचे कामकाज शूरवीर सिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. या सुधारित संरचनेत, बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिब्रेवाल (Tibrewal) यांना शेखावत अहवाल सादर करणार आहेत.
बँकेतील या नवीन घडामोडींबद्दल टिप्पणी करताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच सीईओ श्री. संजय अग्रवाल (Agarwal) म्हणाले, “ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रुपरंग जाणून घेण्याच्या आमच्या 28 वर्षांच्या अनुभवावर आधारित, आम्ही विविध उपक्रम, सामुदायिक परस्परसंवाद आणि कार्यशाळांद्वारे ग्रामीण व्यवस्थेबाबतच्या अंतर्दृष्टीचे आमचे सखोल आकलन वेळोवेळी प्रदर्शित केले आहे आणि हे आकलन व्यापार चक्रांद्वारे प्रत्यक्षात वितरितही केलेले आहे, तसेच व्यापक आणि टिकाऊ असे आर्थिक समावेशकतेचे प्रारूप आकारास आणले आहे. स्थानिक व्यवसायांना यशस्वी करत ते आणखी पुढे नेण्यासाठी त्याचबरोबर देशाच्या सामाजिक-आर्थिक परिघाला आणखी उंचावण्यासाठी आमची स्वतःची व्यापक प्रणाली मोठ्या इकोसिस्टमशी जोडली आहे. त्याच्या माध्यमातून ग्रामीण ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही अतिशय बारकाईने स्वदेश बँकिंग व्यवस्था आकारास आणली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “स्वदेश बँकिंगच्या माध्यमातून आमचे ध्येय स्पष्ट आहे आणि ते म्हणजे ग्रामीण भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्याला अनुकूल आर्थिक उपायांसह सक्षम बनवणे, ज्यामुळे प्रगती आणि समृद्धी प्रज्वलित होते. हा उपक्रम बँकिंग क्षेत्राच्या पलीकडचा आहे आणि तो म्हणजे; संधी वाढवणे, स्वावलंबन जोपासणे आणि प्रत्येक गावात आणि शहरात उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करणे ही वचनबद्धता या उपक्रमात दडलेली आहे.”