Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

आरव कोत्तापल्ली, मोहम्मद तोहीदतनवीर, स्वरीत पाटील, हृदान शहा, आकाश कनन, निष्कल दिवेदी, अर्णा पांड्ये, शनाया रॉय, गोशिका एम, अरीका मिश्रा यांना विजेतेपद !!

पुणे :  आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत आरव कोत्तापल्ली, मोहम्मद तोहीदतनवीर, स्वरीत पाटील, हृदान शहा, आकाश कनन यांनी मुलांच्या गटात तर, निष्कल दिवेदी, अर्णा पांड्ये, शनाया रॉय, गोशिका एम, अरीका मिश्रा यांनी मुलींमध्ये वेगवेगळ्या गटांचे विजेतेपद संपादन केले.

चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ९ वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित आरव कोत्तापल्ली याने तिसर्‍या मानांकित वेदांत शिंदे याचा ११-२, ११-३, ११-७ असा पराभव केला. मुलींच्या गटात दुसर्‍या मानांकित अर्णा पांड्ये हिने अरीना अलमोउला हिचा ११-२, ११-२, ११-० असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.

११ वर्षाखालील मुलांच्या गटात व्दितीय मानांकित मोहम्मद तोहीदतनवीर याने बिगर मानांकित ऋषभ शाम याचा १३-११, ८-११, १३-११, ८-११, ११-९ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. मुलींच्या गटामध्ये अव्वल मानांकित शनाया रॉय तिसर्‍या मानांकित महीका सुब्रमण्यम हिचा ११-२, ११-९, ६-११, ११-३ असा पराभव करून विजतेपद संपादन केले.

१३ वर्षाखालील मुलांमध्ये अव्वल मानांकित स्वरीत पाटील याने व्दितीय मानांकित विवान खन्ना याचा १२-१०, १२-१०, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींमध्ये बिगर मानांकित गोशिका एम. हिने दुसर्‍या मानांकित मिरा क्रेसेजल हिचा ११-४, १४-१२, ११-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

१५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अव्वल मानांकित हृदान शहा याने व्दितीय मानांकित लक्ष्मणा हरी याचा ११-४, ११-४, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. याच गटात मुलींमध्ये व्दितीय मानांकित अरीका मिश्रा हिने अव्वल मानांकित इशा श्रीवास्तवा हिचा ११-९, ११-४, ११-५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवित विजेतेपद मिळवले.

१७ वर्षाखालील मुलांमध्ये अव्वल मानांकित आकाश कनन याने पाचव्या मानांकित मितांश जैन याचा ११-५, १३-११, ११-९ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नावे कोरले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात तिसर्‍या मानांकित निष्कल दिवेदी याने अव्वल मानांकित मय्यपन एल. याचा ११-५, ११-३, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीचे संचालक मरीषा जिल्का आणि असिफ सय्यद आणि सहसंचालक रोहीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सविस्तर निकालः
९ वर्षाखालील मुलेः आरव कोत्तापल्ली (१) वि.वि. वेदांत शिंदे (३) ११-२, ११-३, ११-७;

११ वर्षाखालील मुलेः
मोहम्मद तोहीदतनवीर (२) वि.वि. ऋषभ शाम १३-११, ८-११, १३-११, ८-११, ११-९;

१३ वर्षाखालील मुलेः स्वरीत पाटील (१) वि.वि. विवान खन्ना (२) १२-१०, १२-१०, ११-७;

१५ वर्षाखालील मुलेः हृदान शहा (१) वि.वि. लक्ष्मणा हरी (२) ११-४, ११-४, ११-७;

१७ वर्षाखालील मुलेः आकाश कनन (१) वि.वि. मितांश जैन (५) ११-५, १३-११, ११-९;

१९ वर्षाखालील मुलेः निष्कल दिवेदी (३) वि.वि. मय्यपन एल. (१) ११-५, ११-३, ११-७;

९ वर्षाखालील मुलीः अर्णा पांड्ये (२) वि.वि. अरीना अलमोउला ११-२, ११-२, ११-०;

११ वर्षाखालील मुलीः शनाया रॉय (१) वि.वि. महीका सुब्रमण्यम (३) ११-२, ११-९, ६-११, ११-३;

१३ वर्षाखालील मुलीः गोशिका एम. वि.वि. मिरा क्रेसेजल (२) ११-४, १४-१२, ११-४;

१५ वर्षाखालील मुलीः अरीका मिश्रा (२) वि.वि. इशा श्रीवास्तवा (१) ११-९, ११-४, ११-५;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading