fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsSports

वेदांत शिंदे, ऋषभ शाम, मितांश जैन, अरीना अलमोउला, महीका सुब्रमण्यम यांचा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजयासह अंतिम फेरीत !!

‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा

 

पुणे : आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत वेदांत शिंदे, ऋषभ शाम, मितांश जैन, अरीना अलमोउला आणि महीका सुब्रमण्यम या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवित अंतिम फेरी गाठली.चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ९ वर्षाखालील मुलांच्या गटात तिसर्‍या मानांकित वेदांत शिंदे याने दुसर्‍या मानांकित विश्रूत अरोरा याचा ९-११, ६-११, ११-८, ११-७, ११-८ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. ११ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये ऋषभ शाम याने अव्वल मानांकित क्रिशीव मित्तल याचा ११-५, ११-९, ११-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये पाचव्या मानांकित मितांश जैन याने दुसर्‍या मानांकित वेदांत छेड्डा याचा ११-९, ११-७, ७-११, ११-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित हृदान शहा याने अगस्त्य राजपुत याचा ९-११, ११-२, ११-७, ११-४ असा तर, दुसर्‍या मानांकित लक्ष्मणा हरी याने तिसर्‍या मानांकित शनॉय रॉय याचा ११-५, ११-८, ११-७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

९ वर्षाखालील मुलींमध्ये बिगर मानांकित अरीना अलमोउला याने अव्वल मानांकित रिशिमा महूरकर हिचा ११-५, ६-११, ११-३, ११-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ११ वर्षाखालील मुलींमध्ये तिसर्‍या मानांकित महीका सुब्रमण्यम हिने दुसर्‍या मानांकित गार्गी कदम हिचा ११-७, ८-११, ११-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः सर्व निकाल उपांत्य फेरीः ९ वर्षाखालील मुलेः
आरव कोत्तापल्ली (१) वि.वि. हरीबाला के. ११-१, ११-५, ११-७;
वेदांत शिंदे (३) वि.वि. विश्रूत अरोरा (२) ९-११, ६-११, ११-८, ११-७, ११-८;

११ वर्षाखालील मुलेः
ऋषभ शाम वि.वि. क्रिशीव मित्तल (१) ११-५, ११-९, ११-५;
मोहम्मद तोहीदतनवीर (२) वि.वि. अव्देत केजीरीवाल (३) ११-८, ११-६, ११-९;

१३ वर्षाखालील मुलेः
स्वरीत पाटील (१) वि.वि. आयान दलाल (३) ११-४, ११-५, ११-४;
विवान खन्ना (२) वि.वि. रेयांश कारीआ (४) ११-८, ११-८, ११-७;

१५ वर्षाखालील मुलेः
हृदान शहा (१) वि.वि. अगस्त्य राजपुत (५) ९-११, ११-२, ११-७, ११-४;
लक्ष्मणा हरी (२) वि.वि. शनॉय रॉय (३) ११-५, ११-८, ११-७;

१७ वर्षाखालील मुलेः
आकाश कनन (१) वि.वि. तीर्थ जिल्का (३) ११-३, ११-७, ८-११, ७-११, ११-९;
मितांश जैन (५) वि.वि. वेदांत छेड्डा (२) ११-९, ११-७, ७-११, ११-६;

१९ वर्षाखालील मुलेः
मय्यपन एल. (१) वि.वि. तनिष वैद्य (५) ११-२, ९-११, ११-६, ११-८;
निष्कल दिवेदी (३) वि.वि. तनय कदम (५) ११-५, ११-३, ११-५;

९ वर्षाखालील मुलीः
अरीना अलमोउला वि.वि. रिशिमा महूरकर (१) ११-५, ६-११, ११-३, ११-०;
अर्णा पांड्ये (२) वि.वि. अर्वा शेलार ११-२, ११-०, ११-०;

११ वर्षाखालील मुलीः
शनाया रॉय (१) वि.वि. शनाया परासरामपुरीया (५) ८-११, ११-८, ११-२, ११-२;
महीका सुब्रमण्यम (३) वि.वि. गार्गी कदम (२) ११-७, ८-११, ११-५, रिटायर;

१३ वर्षाखालील मुलीः
गोशिका एम. वि.वि. रसिशा नाईक ११-६, ११-५, ११-२;
मिरा क्रेसेजल (२) वि.वि. अर्णा दिवेशी (३) ९-११, १३-११, १६-१४, ११-७;

१५ वर्षाखालील मुलीः
इशा श्रीवास्तवा (१) वि.वि. दृष्टी पवार (५) ११-९, ११-३, १४-१२;
अरीका मिश्रा (२) वि.वि. सानवी श्री (३) ११-१३, ११-४, ९-११, १३-११, ११-३.

Leave a Reply

%d bloggers like this: