सिग्नेचरग्लोबल (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ 20 सप्टेंबर रोजी खुला होणार
सिग्नेचरग्लोबल (इंडिया) लिमिटेडचा (“एसजीएल” किंवा “कंपनी”) आयपीओ 20 सप्टेंबर 2023 रोजी खुला होणार आहे. यातील प्रत्येक इक्विटी समभागाचे दर्शनी मूल्य 1 रुपया असेल आणि प्रत्येक इक्विटी समभागाची किंमत मिळून 7,300 मिलियन रुपयांची (प्रति इक्विटी समभागासाठी शेअर प्रीमियमसह) ऑफर असून, त्यामध्ये 6,030 मिलियन रुपयांच्या नव्याने जारी करण्यात येत असलेल्या इक्विटी समभागांचा आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून 1,270 मिलियन रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.
ही ऑफर शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 रोजी समाप्त होणार आहे.
प्राईस बँड प्रत्येक इक्विटी समभागासाठी 366 ते 385 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 38 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 38 च्या पटीत बोली लावावी लागेल.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे आहेत.
सिग्नेचरग्लोबल (इंडिया) लिमिटेड ही, 19% बाजारपेठ हिस्सेदारीसह 2020 आणि 31 मार्च 2023 दरम्यानच्या काळात पुरवठा करण्यात आलेल्या युनिट्सच्या संदर्भात (8 मिलियन रुपयांपेक्षा कमी किमतीच्या विभागात) दिल्ली एनसीआरमधील, परवडण्याजोग्या आणि निम्न मध्यम श्रेणीतील सर्वात मोठी रीयल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. (स्रोत: अनारॉक रिपोर्ट)
कंपनीने आपल्या संचालनाची सुरुवात 2014 साली, आपली उपकंपनी सिग्नेचर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत गुरुग्राम, हरियाणामध्ये 6.13 एकर जमिनीवर सोलेरा प्रकल्प सुरु करून केली. तेव्हापासून ही कंपनी सातत्याने वृद्धिंगत होत असून, दशकाहून कमी कालावधीत, 31 मार्च 2023 पर्यंत या कंपनीने दिल्ली एनसीआर क्षेत्रात 27965 निवासी व व्यापारी युनिट्स विकलेली, ज्यांचे एकूण विक्रीयोग्य क्षेत्रफळ 18.90 मिलियन चौरस फीट होते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 16902.74 मिलियन रुपयांची विक्री नोंदवली जी 42.46% सीएजीआरने वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 34305.84 मिलियन रुपयांवर पोहोचली. 31 मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार, कंपनीने 25089 निवासी युनिट्स विकली होती आणि त्यांची सरासरी विक्री किंमत 3.60 मिलियन रुपये प्रति युनिट होती.
सिग्नेचरग्लोबल (इंडिया) लिमिटेडने इनहाऊस क्षमता आणि संसाधनांसह आपल्या प्रकल्पांच्या संपूर्ण अंमलबजावणीमध्ये एकात्मिक रीयल इस्टेट डेव्हलपमेंट मॉडेल स्वीकारले आहे, ज्यामुळे ते आपले प्रकल्प स्पर्धात्मक किमतींना विकू शकतात. प्रकल्प अतिशय कार्यक्षमतेने उभारणे हे या कंपनीचे एक महत्त्वाचे बलस्थान आहे. जमीन संपादन केल्यापासून साधारण 18 महिन्यांच्या आत त्यांनी आपले प्रकल्प लॉन्च केले आहेत.
आपल्या टार्गेट ग्राहकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून या कंपनीने स्वतःचे विशाल वितरण नेटवर्क उभारले आहे, ज्यामध्ये 593 चॅनेल पार्टनर्स आणि प्रत्यक्ष विक्रीमध्ये 41 कर्मचाऱ्यांची तर अप्रत्यक्ष विक्रीमध्ये 100 कर्मचाऱ्यांची टीम यांचा समावेश (31 मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार) आहे. त्यामुळे कंपनीला त्यांच्या ऑफरिंग्सची सध्याची व्याप्ती गाठणे शक्य झाले आहे. विक्रीसाठी ही कंपनी तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावीपणे करते. डायरेक्टरेट ऑफ टाऊन अँड कन्ट्री प्लॅनिंग, हरियाणा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, कंपनीचे परवडण्याजोग्या घरांचे प्रकल्प फक्त डिजिटल चॅनेल्समार्फत विकले जातात आणि जानेवारी 2022 पासून परवडण्याजोग्या घरांच्या प्रकल्पातील सर्व घरे सरकारी वेबसाईटसह ऑनलाईन चॅनेल्समार्फत विकली जात आहेत.
कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये आयएफसी आणि एचडीएफसी कॅपिटल ऍडवायजर्स यांचा समावेश आहे ज्यांनी कंपनीने भांडवल उभारणीसाठी केलेल्या विविध राउंड्समध्ये भाग घेतला होता.