fbpx
Monday, October 2, 2023
ENTERTAINMENTLatest News

करुणा पांडेय म्हणाली, “दोन्ही हातांना बँडेज गुंडाळलेले असताना चित्रीकरण करणे अत्यंत आव्हानात्मक होते”

सोनीवरील लोकप्रिय मालिका पुष्पा इम्पॉसिबलमधील पुष्पाच्या भूमिकेची धुरा जेव्हा करुणा पांडेयच्या अंगावर येते तेव्हा ती केवळ अभिनय करत नसते, तर त्या पात्राच्या विश्वात ती स्वत:ला गुरफटून टाकत असते. ती संपूर्ण निष्ठेने ही भूमिका साकारत असते. मालिकेत असेही काही प्रेरक क्षण येत असतात तेव्हा पुष्पा आपल्या मार्गामधील सर्व संकटांना लीलया तोंड देत असते. यामुळेही पुष्पा इम्पॉसिबल मालिका दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकांसाठी न चुकवण्यासारखी बनली आहे. नुकतेच करुणाने स्वत:च्या मर्यादांना आव्हान देणारा चित्रीकरणाचा आपला एक अनुभव शेअर केला. पुष्पाची व्यक्तीरेखा पडद्यावर जिवंत साकारण्यासाठी किती समर्पणाची गरज आहे, याची चुणूक या दृश्यामधून दिसते.

मालिकेतील अलीकडच्या भागात, विरेनच्या (हेमंत खेर) कुटील कारस्थानामुळे एका मशीनमध्ये येऊन पुष्पाच्या दोन्ही हातांना जखमा होताना प्रेक्षकांना दिसणार आहे. मात्र आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी पुष्पा माघार घेण्यास तयार नसते. तिच्या तळहातांना मोठ्या प्रमाणात बँडेजेस गुंडाळलेली असतानाही ती जिद्दीने आपल्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मागे लागते. या दृश्याच्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर करताना करुणाने आपल्या आठवणी सांगितल्या. हाताला मोठी जखम झाली असताना चहा, पोळ्या लाटणे आणि इतर शारीरिकदृष्ट्या कठीण कामे करण्याची दृश्ये चित्रीत करण्यात किती अडचणी येत होत्या, हेही तिने सांगितले.

मालिकेत पुष्पाची भूमिका निभावणारी करुणा पांडेय म्हणाली की, “खरं तर माझ्यासाठी एखाद्या पात्रात शिरणे हे त्या भूमिकेशी पूर्णपणे समरूप होण्यासारखे असते. एका वर्षापेक्षा जास्त काळ पुष्पाची भूमिका साकारल्यामुळे मी पुरेपूर तिचे आयुष्य जगत आहे. याबाबत मी खूप संशोधन केले. पुष्पाच्या दोन्ही हातांना जखमा होण्याचा सीन करत असताना दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या अडीअडचणी आणि संकटांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हातांना बँडेजेस गुंडाळलेली असताना अभिनय करणे प्रचंड आव्हानात्मक हाेते. तथापि, अगदी प्रतिकूल परिस्थितीतही पुष्पाचे बलस्थान आणि सकारात्मकता साकारणे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते. इतकेच नव्हे तर सेटवर असतानाही हाताला बँडेजेस गुंडाळलेली होती. अशा वेळी मी माझा फोन वापरण्यासाठी ढोपरांचा वापर करायचे.”

पाहायला विसरू नका, पुष्पा इम्पॉसिबल, शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी सबवर

Leave a Reply

%d bloggers like this: