सोनीने BRAVIA XR MASTER Series A95L OLED बाजारात आणली
नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज नवीन ओएलईडी पॅनलसह कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआरने संचलित (Cognitive Processor XR with new OLED panel) नवीन ब्रॅव्हिआ एक्सआर मास्टर सिरीज ए-९५एल ओएलईडी (BRAVIA XR MASTER Series A95L OLED)बाजारात आणण्याची घोषणा केली.
नवीन ब्रॅव्हिआ एक्सआर मास्टर सिरीज ए-९५एल ओएलईडी (BRAVIA XR MASTER Series A95L OLED) १६४ सेमी (६५ इंच) आणि १३९ सेमी (५५ इंच) या दोन स्क्रीन साइजमध्ये आहे. सोनी ब्राव्हिआ एक्सआरटीएम टीव्ही सिरिजमधील क्रांतिकारी प्रोसेसर अक्षरशः वास्तविक व जिवंत वाटेल असा अभूतपूर्व अनुभव मिळण्यासाठी ज्याप्रकारे माणसे प्रत्यक्ष ऐकतात आणि पाहतात तसा कंटेन्ट निर्माण करतो.
याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
· ब्रॅव्हिआ एक्सआर ए-९५एल ओएलईडी (BRAVIA XR A95L OLED) टीव्ही मध्ये एक्सआर ओएलईडी काँट्रास्ट प्रो पॉवर आहे; जे ओएलईडी पॅनलला समर्थित करते आणि ज्यामुळे तुम्ही सर्वात चमकदार रंग आणि प्युअर काळ्या रंगासह खऱ्या अर्थाने काँट्रास्टचा आनंद घेऊ शकता.
· ए-९५एल टिव्ही मध्ये ४के १२०एफपीएस (4K 120fps), वेरिएबल रिफ्रेश रेट (Variable Refresh Rate-VRR), ऑटो लो लेटन्सी मोड (Auto Low Latency Mode -ALLM), ऑटो एचडीआर टोन ऑटो गेम मोडसोबतच (Auto HDR Tone Auto Game Mode) एचडीएमआय २.१ (HDMI 2.1) पुरकता आहे, ज्यामुळे तुम्हाला शूटिंग, खेळ, उच्च कार्यक्षमता गेम यामध्ये ताबडतोब ऑन-स्क्रीन अॅक्शन सह अन्य फायदे मिळतील.
· यामध्ये ब्रॅव्हिआ कोअर अॅप (आधीच अपलोड केलेले चित्रपट) आहे, जी २४ महीने प्रसिद्ध चित्रपटांच्या स्ट्रीमिंगसोबतच नवीन प्रदर्शित झालेले १० चित्रपट आणि 4K ब्ल्यू रे तंत्रज्ञानामध्ये प्रक्षेपित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोनी पिक्चरच्या अफाट मोठ्या अश्या चित्रपट लायब्रेरीमध्ये सुद्धा हा टीव्ही प्रवेश मिळवून देतो.
· ए-९५एल सिरीजमध्ये सहज वापरता येण्यासारखे गेम मेन्यू आहे. या मेन्यूच्याआधारे गेम खेळणारा सेटिंग्समध्ये जाऊन आपल्या आवडीनुसार व सोयीनुसार प्राधान्यक्रम ठरवू शकतो.
· नवीनब्राव्हिआ एक्सआर ए-९५एल (BRAVIA XR A-95L) मध्ये अप्रतिम पिक्चरच्या दर्जासाठी ब्राइटनेस्, रंग आणि हाय डायनॅमिक रेंज (HDR) यांच्यासह ४के स्पष्टता आहे. हा डॉल्बी व्हिजनटीएम (Dolby Vision™) आणि डॉल्बी अॅटमॉसटीएम (Dolby Atmos™) ने समर्थित आहे.
· ब्रॅव्हिआ एक्सआर ए-९५एल ओएलईडी (BRAVIA XR A95L OLED) टीव्ही स्क्रीनला मल्टी चॅनल स्पीकरमध्ये बदलण्यासाठी विशेष अॅक्टयूएटर वापरतो. त्यामुळे आवाज स्क्रीन वर असलेल्या गोष्टींशी तंतोतंत जुळते.
