‘स्वरविलास’ सांगीतिक कार्यक्रमात पं संजीव अभ्यंकर आणि साईप्रसाद पांचाळ यांचे गायन
पुण : ‘स्वरविलास’ या सांगीतिक कार्यक्रमात मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांचे सुरेल गायन ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. याबरोबरच पं संजीव अभ्यंकर यांचे शिष्य साईप्रसाद पांचाळ हे देखील आपली गायनकला सादर करतील.
उद्योजक विलास जावडेकर यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येत्या रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता बालशिक्षण प्रशालेतील एम ई एस सभागृह या ठिकाणी तो संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका या २५ ऑगस्टपासून विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या कोथरूड व सूस येथील कार्यालयात सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहेत.
पं संजीव अभ्यंकर हे शास्त्रीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कलाकार असून अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आले आहे. तर प्रतिभावान तरुण कलाकार साईप्रसाद पांचाळ हे पं संजीव अभ्यंकर यांचे शिष्योत्तम आहेत.