Wednesday, May 6, 2026
ENGLISH

एमक्युअर फामास्युटिकल्सचा आर्थिक निकाल जाहीर; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट कामिगरीची नोंद

पुणे : एमक्युअर फार्मास्युटिकल्सने (BSE:544210, NSE: EMCURE) आर्थिक निकाल आज जाहीर केले. ३१ मार्च २०२६ रोजी चौथ्या तिमाहीचा कालावधी संपला. कालावधीपर्यंतचे एकत्रित निकाल आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याचसोबत संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोगादेखील सादर करण्यात आला आहे.

एमक्युअर फार्मास्युटिकल्स कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या पाच वर्षांच्या धोरणात्मक योजनेचे पहिले वर्ष यशस्वी ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२६मध्ये कंपनीने १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल मिळवला. यात १६.६ टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली. कंपनीने जागतिक बाजारपेठेत मोठी प्रगती केली आहे. भारतीय बाजारपेठेतही व्यवसायाची वाढ स्थिर राहिली आहे. आमच्या निव्वळ नफ्यात यावर्षी सुमारे ४१ टक्क्यांची वाढ दिसून आली. आम्ही व्यवसाय विस्तारासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. आता युके आणि कॅनेडा या देशांतील कंपन्यांची खरेदी केला जाईल, जुव्हेंट्सच्या भागभांडवलाचा समावेश केला जाईल. आमचे नवीन संशोधन आणि औषधे भविष्यात व्यवसायाला नवी उंची देतील. उद्योगातील सरासरीपेक्षा जास्त प्रगती करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमचा सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याकडे लक्ष्य आहे. आम्ही शाश्वत प्रगतीसाठी प्रयत्नशील आहोत.”

संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोगा खालीलप्रमाणे:

  • कंपनीचा मुख्य व्यवसाय महसूल ९ हजार २०४ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात १६.६ टक्के वाढ झाली आहे. ही प्रगती कंपनीने दिलेल्या पूर्वीच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे.
  • कंपनीचा एबिटडा १ हजार ७८९ कोटीपर्यंत नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २१.८ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. कंपनीचा कामकाजी नफा मार्जिन १९.४ टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे.
  • या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा १४१ कोटींपर्यत पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३३.१ टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे.
  • कंपनीचा सुधारित निव्वळ नफा १ हजार ८ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात ४०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • देशांतर्गत व्यवसायाची विक्री ४ हजार २७ कोटींपर्यंत नोंदवली गेली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात १० टक्के वाढ नोंदवण्यात आली. हृदयविकार, मज्जासंस्था, कर्करोग या विभागांनी विकास प्रक्रियेत मोलाचा वाटा उचलला. ही वाढ बाजारातील सरासरी वेगाशी सुसंगत आहे. कंपनीने आपल्या उपकंपनीतील अल्पसंख्याक हिस्सा खरेदी करुन देशांतर्गत कामकाज मजबूत केले आहे. सर्व विभागातील नेतृत्वाची फळी सक्षम करण्यात आली आहे. तसेच, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागीदारी करुन औषधांचा संच वाढवण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमुळे कंपनीची बाजारपेठेतील पकड अधिक घट्ट झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय व्यवसायाने ५ हजार १७७ कोटी रुपयांची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २२.२ टक्क्यांपर्यंत वाढ आहे. कंपनीच्या मूळ व्यवसायातील प्रगतीमुळे हा वेग साधता आला. कंपनीने स्वतः विकसित केलेली नवी औषधेही बाजारात आणली आहे.

 

चौथ्या तिमाहीच्या कामगिरीचा तपशील खालीलप्रमाणे:

  • या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल २ हजार ४७० कोटीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये १६.७ टक्क्क्यांची वाढ झाली आहे.
  • कंपनीचा एबिटडा ४८५ कोटी रुपयांपर्यंत नोंदवला गेला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २४.५ टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली. कंपनीच्या एबिटडा मार्जिनमध्येही १९.७ टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली.
  • कंपनीचा करारानंतरचा नफा २४४ कोटीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २३.६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
  • कंपनीचा समायोजित निव्वळ नफा २७९ कोटीपर्यंत नोंदवला गेला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ३६.० टक्क्यापर्यंतची वाढ दिसून आली.
  • देशांतर्गत व्यवसायाची विक्री ९७७ कोटीपर्यंत झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ५.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. जुव्हेंट्स पोर्टफोलिओमध्ये झालेले बदल आणि टीमच्या पुनर्रचनेमुळे ही वाढ अपेक्षेपेक्षा संथगतीने दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विक्री १ हजार ४९३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २५.७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील प्रमुख केंद्रांमधील कामगिरी चांगली असल्याचे दिसून आले. मूळ व्यवसायाचा विस्तार आणि नवीन उत्पादनांची विक्री यामुळे ही प्रगती साधता आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading