Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

विचारांचा वारसा जपणाऱ्या संस्थांचे कार्य  निश्चितच भव्य दिव्य होते – प्रवीण  तरडे

पुणे : एखादी संस्था मोठी होत असताना आधीच्या पिढीने ज्या विचाराने ती संस्था सुरू केली तो विचार नवीन पिढी तितक्याच ताकदीने, नव्या जोमाने पुढे नेत असेल तर अशा विचारांचा वारसा जपणाऱ्या संस्थांचे कार्य निश्चितच भव्य दिव्य होते,असे मत प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्या यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.यशस्वी संस्थेने सुरू केलेल्या शिका आणि कमवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांमधील बेरोजगार युवक युवतींना रोजगारक्षम करण्याचं महत्त्वाचं काम होत आहे म्हणूनच अशा संस्थेचा ब्रँड अँबेसिडर म्हणजेच सदिच्छा दूत  होण्याची जबाबदारी मी स्वीकारली असेही प्रवीण तरडे यावेळी म्हणाले.

तर यावेळी  आपले मनोगत व्यक्त करताना  यशस्वी  संस्थेचे अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णी  यांनी सांगितले  की, यशस्वी  संस्थेने सुरु केलेल्या  शिका आणि कमवा योजनेच्या माध्यमातून  सुरु केलेल्या  नव्या समांतर शिक्षण प्रणालीला जेव्हा सर्व स्तरातून विशेषतः  राष्ट्रीय  स्तरावरून मान्यता  मिळेल, तेव्हा ही  योजना देशव्यापी होऊन  देशातील  हजारो लाखो  युवक युवतींना  स्वावलंबी  शिक्षणाद्वारे  रोजगारक्षम  होण्याचा मार्ग  सुकर होईल.

याप्रसंगी यशोगाथा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक डॉ.अभिषेक कुलकर्णी, यशस्वी संस्थेच्या संचालिका  शोभा  कुलकर्णी,  एसकेएफ कंपनीचे  माजी कामगार संघटना प्रमुख  भास्करन, भारत  फोर्ज  कंपनीचे  माजी वरिष्ठ  मनुष्यबळ व्यवस्थापक  डॉ. संतोष  भावे, यशस्वी संस्थेचे वित्त  विभाग प्रमुख देविदास माळी, आयआयएमएसचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे, यशस्वी  संस्थेचे  मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, ऑपरेशन   विभाग प्रमुख  कृष्णा  सावंत, संचालक अजय रांजणे, संचालिका स्मिता  धुमाळ,  यांच्यासह यशस्वी संस्थेतील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे  प्रमुख  प्रशांत  कुलकर्णी  यांनी  केले. तर आभार प्रदर्शन  यशस्वी  संस्थेचे  मनुष्यबळ व्यवस्थापक  श्रीकांत  मिरजकर  यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading