हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरात असणाऱ्या पूर्णा नगर येथे दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेचीअचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाकडून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. चौधरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानचं हे कुटुंब हार्डवेअरचं दुकान चालवायचं आणि दुकानाच्या माळावर राहत होते. शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे.