Wednesday, May 6, 2026
BusinessLatest News

टाटा एसेट मॅनेजमेंटचा नवीन ‘टायटॅनियम इक्विटी लाँग-शॉर्ट फंड’

मुंबई : टाटा एसेट मॅनेजमेंटने आज आपल्या प्रमुख ‘टायटॅनियम स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड’ (SIF) अंतर्गत ‘टायटॅनियम इक्विटी लाँग-शॉर्ट फंड’ लाँच करण्याची घोषणा केली आहे. ‘इक्विटी लाँग-शॉर्ट’ श्रेणीतील या फंडाचे उद्दिष्ट इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमधील गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करून मध्यम ते दीर्घकाळात चांगला नफा मिळवून देणे हे आहे. या फंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बाजाराच्या स्थितीनुसार हा फंड आपली निव्वळ इक्विटी गुंतवणूक -२५% ते १००% दरम्यान कधीही कमी किंवा जास्त करू शकतो.

या फंडाची ‘न्यू फंड ऑफर’ २७ एप्रिल २०२६ रोजी खुली झाली असून आणि ११ मे २०२६ रोजी बंद होईल. हा फंड विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांची जोखीम स्वीकारण्याची क्षमता खूप जास्त आहे. यासाठी एका एसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पॅन (PAN) स्तरावर सर्व ‘स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स’ मिळून किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक असणे अनिवार्य आहे.

टायटॅनियम इक्विटी लाँग-शॉर्ट फंड मुख्यत्वे समभागांवर (इक्विटी) आधारित आहे. हा फंड आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ८०% हिस्सा शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवतो. जोखीम कमी करण्यासाठी हा फंड ‘डेरिव्हेटिव्ह्ज’चा वापर करू शकतो, तसेच बाजार कोसळत असताना त्याचा फायदा घेण्यासाठी पोर्टफोलिओच्या २५% मर्यादेपर्यंत ‘शॉर्ट पोझिशन’ घेऊ शकतो. एसआयएफ नियमांनुसार, या फंडाची एकूण गुंतवणूक त्याच्या निव्वळ मालमत्तेच्या १००% पेक्षा जास्त असू शकत नाही.

फंडाच्या लाँच प्रसंगी टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर, आनंद वरदराजन म्हणाले, “एसआयएफ फ्रेमवर्कमुळे पारंपारिक म्युच्युअल फंड आणि मोठ्या गुंतवणूक पर्यायांच्या (AIF/PMS) दरम्यान एक नवीन आणि धोरणात्मक मार्ग उपलब्ध झाला आहे. यामुळे आम्हाला टॅक्सची बचत करत गुंतवणूकदारांसाठी प्रगत आणि आधुनिक धोरणे आणता येत आहेत. ‘टायटॅनियम इक्विटी लाँग शॉर्ट फंड’च्या माध्यमातून आम्ही आमच्या एसआयएफ प्लॅटफॉर्मचा विस्तार करत आहोत. हे एक असे लवचिक साधन आहे, ज्याचे उद्दिष्ट बाजाराची स्थिती कशीही असली तरी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळवून देणे हे आहे. या फंडात अशी क्षमता आहे की, तो बाजारानुसार आक्रमकपणे गुंतवणूक करू शकतो, मंदीचा फायदा घेऊ शकतो किंवा जोखीम कमी करण्यासाठी ‘आर्बिट्रेज’चे रूप धारण करू शकतो. यामुळे गुंतवणूकदारांना बाजाराच्या प्रत्येक चढ-उतारात गुंतवणुकीचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते.”

हा फंड बाजारातील तेजी आणि मंदी (लॉन्ग आणि शॉर्ट गुंतवणूक) अशा प्रकारे मॅनेज करतो की, तो केवळ बाजाराच्या दिशेवर अवलंबून राहत नाही. शेअर बाजारातील चढ-उतारांचे रूपांतर नफ्याच्या संधीत करणे, हे या फंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे—मग बाजार वर जात असो, खाली पडत असो किंवा एकाच जागेवर स्थिर असो. जेव्हा बाजार वेगाने वर जात असतो, तेव्हा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हा फंड शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवतो. पण जेव्हा शेअर बाजार खूप महाग होतो किंवा धोका वाढतो—जसे की अलीकडच्या जागतिक तणावामुळे बाजारात घसरण झाली होती—अशा वेळी हा फंड आपली गुंतवणूक कमी करतो, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील. या फंडाच्या कामगिरीची तुलना ‘निफ्टी ५००’ इंडेक्ससोबत केली जाईल.

टायटॅनियम एसआयएफचे फंड मॅनेजर सूरज नंदा म्हणाले: “पारंपारिक इक्विटी फंड बाजार कोणत्याही स्थितीत असला तरी शेअर्समधील आपली गुंतवणूक नेहमी जास्त ठेवतात. याउलट, ‘टायटॅनियम इक्विटी लाँग शॉर्ट फंड’ची रचना बाजाराच्या मूल्यांकनानुसार गुंतवणूक कमी किंवा जास्त करण्यासाठी करण्यात आली आहे. हा फंड मुख्यत्वे शेअर्सवर केंद्रित असेल, पण त्याच वेळी ‘लॉन्ग’ आणि ‘शॉर्ट’ पोझिशनच्या माध्यमातून बाजारातील तेजी किंवा मंदी या दोन्ही स्थितींचा फायदा घेण्याचे स्वातंत्र्य देईल. ही रणनीती जोखीम वाढल्यास गुंतवणूक सुरक्षित करण्याचा पर्याय देते, तर परिस्थिती अनुकूल असल्यास समभागांमधील गुंतवणूक १००% पर्यंत वाढवण्याची सुविधाही देते. पोर्टफोलिओच्या २५% मर्यादेपर्यंत ‘शॉर्ट पोझिशन’ घेता येत असल्याने, हा फंड वाढणाऱ्या आणि पडणाऱ्या दोन्ही प्रकारच्या शेअर्समधून नफ्याची संधी शोधतो. आमचे लक्ष मूलभूत संशोधन, शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापन आणि डेरिव्हेटिव्ह्जच्या प्रभावी वापरावर आहे, जेणेकरून केवळ बाजारातील तेजीच नव्हे, तर बाजार स्थिर असताना किंवा घसरत असतानाही उत्तम कामगिरी करता येईल.”

टायटॅनियम एसआयएफ प्लॅटफॉर्म अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आला आहे जे काहीतरी वेगळ्या आणि प्रगत गुंतवणूक धोरणांच्या शोधात आहेत; तसेच ज्यांना याची जाणीव आहे की, ‘स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड’मध्ये पारंपारिक म्युच्युअल फंडांच्या तुलनेत भांडवल गमावण्याची जोखीम काहीशी जास्त असते. एसआयएफ हे सेबी द्वारे नियंत्रित केले जातात आणि त्यांची कररचना म्युच्युअल फंडांप्रमाणेच असते. कोणत्याही एसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पॅन (PAN) स्तरावर सर्व एसआयएफ मिळून किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक असणे अनिवार्य आहे. हे फंड प्रामुख्याने अशा सधन आणि ‘हाय-नेट-वर्थ’ गुंतवणूकदारांसाठी आहेत जे उत्तम जोखीम व्यवस्थापनासह गुंतवणुकीत नाविन्य शोधत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading