एक राखी दिव्यांग बांधवांसाठी!
पुणे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात ‘एक राखी दिव्यांग बांधवांसाठी’ हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून आणि समाजात एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी, या भावनेतून नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी, मतदारसंघातील महिला भगिनींनी, दिव्यांग भगिनींनी दिव्यांग बांधवांना राखी बांधून हा अतिशय जिव्हाळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित भगिनींकडून राखी बांधून घेत, सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या पवित्रदिनी भावा-बहिणीच्या नात्यातल्या पावित्र्याला उजाळा मिळो, नात्यातील स्नेहबंध वृद्धिंगत होवो, ही सदिच्छा व्यक्त केली!