fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलिसांसोबर रक्षाबंधन

पुणे :  शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने एक धागा मायेचा आणि सुरक्षिततेचा या उपक्रमांतर्गत आज पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन स्टेशन, महेश सोसायटी चौक,भारती विद्यापीठ, कात्रज चौक, समर्थ पोलीस स्टेशन, रास्ता पेठ पावर हाउस, कोथरूड पोलीस स्टेशन, कोथरूड चौक,शनिवार चौक, बोपोडी औंध चौक या विविध पोलीस स्टेशन तसेच वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या ट्रॅफिक पोलीस बांधवाना त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन रक्षाबंधन साजरे केले आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी सामान्य माणसाच्या मदतीस नेहेमी तत्परतेने धावणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले. या वेळी पोलीस बांधवांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर महिलाध्यक्षा सौ मृणालिनी मदन वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात सौ प्राजक्ता जाधव,वंदना मोडक, राजेश्वरी पाटील,प्रतिभा भूमकर,मीना पवार,संगीता जैस्वाल,सुवर्णा सावर्डे, सुचित्रा बडगुजर, दिलशाद आत्तार,वसुधा निरभवने,ज्योती सूर्यवंशी,नंदिनी पानेकर यांनी केले होते

Leave a Reply

%d