रायझिंग स्टार्स, राईझ-टू-प्ले इलेव्हन, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!
पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार्स संघाने सलग दुसरा विजय तर, राईझ-टू-प्ले इलेव्हन आणि पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत निखील नासेरी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने स्पाटर्न्स् क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्पाटर्न्स् क्रिकेट क्लबला ११३ धावा धावफलकावर लावता आल्या. कपिल कुर्लेकर (३-१७) आणि निखील नासेरी (३-१०) यांनी अचूक गोलंदाजी केली. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने हे आव्हान १३.३ षटकात व ५ गडी गमावून सहज पूर्ण केलेे. स्वानंद भागवत याने ४० धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.
अभिषेक कौशिक याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रायझिंग स्टार्सने कॉर्पोरेट विलोवर्सचा ३५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग स्टार्सने १३९ धावांचे आव्हान उभे केले होते. संकेत ऐकल (४७ धावा) आणि विनोद पवार (४१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या धावसंख्येसमोर कॉर्पोरेट विलोवर्सचा डाव १०४ धावांवर मर्यादित राहीला. अभिषेक कौशिक याने १० धावात ३ तर, रविंद्र पाटील आणि फर्श अन्सारी यांनीही अचूक गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
बंटी रायकर याच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर राईझ-टू-प्ले इलेव्हनने राईझिंग बॉईज संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पाटर्न्स् क्रिकेट क्लबः १७ षटकात १० गडी बाद ११३ धावा (प्रतिक लावलेकर ४३, शिवराम गावडे २०, कपिल कुर्लेकर ३-१७, निखील नासेरी ३-१०, अम्रित अलोक २-२०) पराभूत वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः १३.३ षटकात ५ गडी बाद ११५ धावा (स्वानंद भागवत ४०, प्रसाद कुंटे नाबाद १७, पार्थी नाईकर ३-२८); सामनावीरः निखील नासेरी;
रायझिंग स्टार्सः १८.५ षटकात १० गडी बाद १३९ धावा (संकेत ऐकल ४७, विनोद पवार ४१, उमेश सिंग २-१९, नितीन चौहान २-२२, अभिजीत देशमुख २-२२) वि.वि. कॉर्पोरेट विलोवर्सः १६.१ षटकात १० गडी बाद १०४ धावा (प्रविण सिंग ३०, रजत श्रीवास्तव २६, अभिषेक कौशिक ३-१०, रविंद्र पाटील ३-१६, फर्श अन्सारी २-२३); सामनावीरः अभिषेक कौशिक;
राईझिंग बॉईजः २० षटकात ९ गडी बाद १९४ धावा (रोहन साळुंखे ५५ (३२, ६ चौकार, ३ षटकार), लहान परासे ४०, शाम बिष्णोई ३४, आकाश नेगे २०, कमलेश पैलवान ३-३५) पराभूत वि. राईझ-टू-प्ले इलेव्हनः १७.४ षटकात ७ गडी बाद १९७ धावा (विश्वास उंटागळे ७० (३८, ३ चौकार, ६ षटकार), बंटी रायकर नाबाद ५३ (२१, ४ चौकार, ५ षटकार), कमलेश चौगुले २२, संग्राम पोखळे २१, शाम बिष्णोई ३-३५, अजय ठाकूर २-२२); सामनावीरः बंटी रायकर;
