Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश ‘प्रवक्ते’ पदी संतोष शिंदे यांची निवड

पुणे : संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य पदाधिकारी बैठकीमध्ये रविवार दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांची संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्ते पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे व महासचिव मा. सौरभ खेडेकर यांनी केली. यावेळी सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सर्वांनी या निवडीचे अभिनंदन केले.

संभाजी ब्रिगेडचे वेगवेगळी आंदोलने, मोर्चै, मेळावे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी व नागरिकांचे प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संतोष शिंदे धडाडीने मांडत असतात. संभाजी ब्रिगेडची भूमिका वेळोवेळी प्रत्येक स्तरावर ताकतीने मांडण्याचे काम आजपर्यंत त्यांनी केले आहे. इतिहासातील घुसखोरीबाबत ते नेहमी आक्रमक असतात. संतोष शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचे आजपर्यंत काम त्यांनी केले आहे. तसेच संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक म्हणून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये संपर्क साधून नवीन लोकांना चळवळीमध्ये आणण्याचा त्यांचा संघटनात्मक प्रयत्न चांगला आहे.

शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर-साठे यांची विचारधारा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी व सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे काम करण्यासाठी संतोष शिंदे नेहमी प्रयत्नशील असतात. पुरोगामी, परिवर्तनवादी विचार वेगवेगळ्या समाज माध्यमांवर ताकतीने मांडण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात तरुण-तरुणी विद्यार्थी यांना केंद्रबिंदू म्हणून यापुढे संभाजी ब्रिगेड बांधणीसाठी सर्वतोपरी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. वेगवेगळ्या प्रश्नावर अजून ताकतीने आंदोलन करण्यासाठी योग्य भूमिका मांडण्याचे काम संतोष शिंदे भविष्यात निश्चित करतील.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या आदेशाने सर्व यापुढे सर्व दूरदर्शन माध्यमांवर व वर्तमानपत्रात सुद्धा संभाजी ब्रिगेडचे अधिकृत भूमिका मांडण्यात साठी आणि तळागाळापर्यंत संभाजी ब्रिगेड पोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते पदी योग्य व्यक्तीची निवड झालेली आहे असं महाराष्ट्रातील सर्व संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व हिचिंतकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading