Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खासदार नवनीत राणा यांना धमकी

अमरावती : गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांना धमकीचे फोन येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावेळी खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. तसेच धमकी प्रकरणी तक्रार दाखल करून सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या तक्रारीत नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने मी तिवसामधून बोलतो आहे असे सांगितले. त्याचबरोबर त्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

‘तू गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही’. त्याचबरोबर फोनवर अश्लील शिवीगाळ करून खालच्या भाषेचा वापर केला, असेही नवनीत राणांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading