Friday, May 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

“मसूरची ऐतिहासिक यशोगाथा” लवकरचं रसिकांच्या भेटीला

सातारा जिल्ह्यातील मसूर गावाला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा लाभला असून असा अमूल्य दुर्मीळ खजिना यांचा ठेवा एकत्रित करून तो महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला जावा यासाठी मसूर ग्रामपंचायत निर्मिती व द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अ. ब. क या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे यांच्या कुशल दिग्दर्शनातून आता मसूर ची यशोगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

“मसूरची यशोगाथा या ऐतिहासिक माहितीपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभ माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व  खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांच्या भारदस्त आवाजामध्ये मसूरचा इतिहास उजाळून निघाला आहे. सातारा जिल्ह्यातील मसूर हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. इतिहासाची पाने चाळताना मसूरचा उल्लेख आवर्जून आढळतो.

सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन दुर्मिळ गुणवैशिष्ट्यांचा ठेवा या माहितीपटाद्वारे सर्वांच्या समोर यावा यासाठी “मसूरची ऐतिहासिक यशोगाथा” ही मसूर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व रामकुमार शेडगे यांच्या कुशल दिग्दर्शनातून लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असून या गाथेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्याने जनसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

लेखक पथकथा संवाद – बाळकृष्ण गुरव, संशोधन लेखन सौरभ बाचल, संकल्पना – जगन्नाथ कुंभार, कॅमेरामन श्रीकांत वारे, अनिल कुंभार आणि पेंटिंग नीरज सबनीस यांनी काढली आहेत. मसूरची ऐतिहासिक यशोगाथा” लवकरचं रसिकांच्या भेटीला अशी माहिती दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading