Friday, May 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Crime News : अल्पवयीन मुलाला धमकावून तरुणीने केला अत्याचार

पुणे : एका अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणीवर पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( Crime News: A young woman raped a minor boy by threatening him)

कोंढवा पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी शेजारी आहेत. तरुणीने मुलाला जाळ्यात ओढून माझ्याशी संबंध ठेव नाही तर, तू माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्याशी संबंध जोडले. अल्पवयीन मुलाला मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास सांगितले. तरुणीच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बाबर तपास करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading