Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिना निमित्त अंनिस तर्फे.16 ते 20 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिना निमित्ताने दि.16 ते 20 ऑगस्ट दरम्यान  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुणे येथे  विविध  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

१६ ऑगस्ट : फोटो प्रदर्शन
नंदिनी जाधव यांनी गेल्या दहा वर्षात जटमुक्त केलेल्या २७५ पेक्षा अधिक महिलांच्या विषयी बातम्या त्यांचे अनुभव याच्यावर आधारित प्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर चे कलादालन,
वेळ – सकाळी १० ते संध्या. ८.
प्रमुख उपस्थिती- प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक आणि अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार

17ऑगस्ट: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 12 पुस्तकांचे लोकार्पण
हस्ते- अच्युत गोडबोले
अध्यक्ष- डॉ. सुरेश गोसावी. (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),
प्रमुख उपस्थिती : हमीद दाभोलकर, राहुल थोरात
स्थळ- रिफ्रेट्री सभागृह , सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे.
वेळ: सायंकाळी 5 ते 7

18 ऑगस्ट:
जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याविषयी चर्चासत्र.
डॉक्टरांच्या निर्घृण खुनानंतर मंजूर झालेला जादूटोणा विरोधी कायदा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांतून आकाराला आलेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या दोन कायद्यांच्या मंजुरीच्या प्रक्रीयेपासून त्यांची सद्यस्थितीतील अंमलबाजवणी या विषयी पुण्यातील आय. एल. एस. लॉं कॉलेज व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
वेळ: सकाळी १.३० ते ५.३०
स्थळ: आय. एल. एस. विधी महाविद्यालय, लॉं कॉलेज रोड, पुणे.
प्रमुख उपस्थिती : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि एडवोकेट अभय नेवगी.

19 ऑगस्ट :अंनिसचा हास्य जागर:
‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील महाराष्ट्रातील मान्यवर अभिनेत्यांनी लिहून बसवलेली दोन स्कीट व त्या अनुषंगाने चर्चा.
प्रमुख उपस्थिती : सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सोनाली कुलकर्णी आणि अतुल पेठे
वेळ: संध्याकाळी 5 ते 7.
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (पत्ता: राष्ट्र सेवादल, मध्यवर्ती कार्यालय, दांडेकर पूलाच्या जवळ )

20 ऑगस्ट सकाळी 11 वा.
कायदा प्रबोधन यात्रा प्रारंभ
स्थळ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काढण्यात येणार्‍या महाराष्ट्रव्यापी जादूटोणा विरोधी कायदा यात्रेचा आरंभ.
हस्ते: अशोक धिवरे, माजी पोलीस महानिरीक्षक

20 ऑगस्ट- सायं.५ वा.
चर्चासत्र: विषय: वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित समाजधारणेची सद्यस्थिती
वेळ: संध्याकाळी 5 ते 7.30
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय,दांडेकर पूलाच्या जवळ )
सहभाग: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अलका धुपकर, प्रतिक सिन्हा (संपादक,अल्ट न्यूज), आशिष दिक्षित (संपादक,बी. बी. सी.)

हिंदी अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन
या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन हिंदी भाषेतील पुस्तकांचे लोकार्पण केले जाईल.
प्रमुख उपस्थिती- डॉ.सुनीलकुमार लवटे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading