Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गोपाळदादा तिवारी कुटुंबियांची भेट..!


पुणे – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे धाकटे बंधु गोविंद तिवारी यांचे नुकतेच (७ॲा.) रोजी दुःखद निधन झाले. या पार्श्वभुमिवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर आले असतांना धोले रोड येथील जितेंद्र व्हीला निवासस्थानी गोपाळदादा तिवारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व गोविंद यांचे बरोबर कुटुंबियांची देखील आस्थेने चौकशी केली.


नारायण पेठेतील, गांधीवादी विचारांचे जुन्या पिढीतील काँग्रेसप्रेमी स्व शंकररावजी तिवारी यांचे गोविंद तिवारी हे कनीष्ठ पुत्र होते. अ भा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात युवक काँग्रेस प्रतिनिधी म्हणुन सहभागी झाले होते. गोविंद तिवारी हे नुमवि व बिएमसीसीचे माजी विद्यार्थी होते. ते प्रासंगिक जागा फ्लॅट खरेदी-विक्री, भाड्याने कमिशनचा व्यवसाय देखील करत होते. ज्योतीष शास्त्रात रस असल्याने पं नंदकुमार जकातदार यांचे स्वाध्याय महाविद्यालयातुन ज्योतिष शास्त्रा विषयी शिक्षण घेतले.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भिमपुत्र टेक्सास गायकवाड, अजित दरेकर, भोला वांजळे, धनंजय भिलारे, ॲड फैयाज शेख, ॲड संदिप ताम्हणकर, शंकर शिर्के, हरीदास अडसुळ, विनायक पाटील, ॲड विठ्ठल आरुडे, गणेश शिदे, विकास दवे, नरेश आवटे इ उपस्थित होते..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading