हिंसाचार हा आता जम्मू काश्मीरचा भूतकाळ, आता जम्मू काश्मीरची वाटचाल विकासाच्या दिशेने – जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा
पुणे – रस्त्यावरील दगडफे क, जाळपोळ , हिंसाचार हा आता काश्मीरचा भूतकाळ झाला आहे. शाळा, दुकाने आणि महाविद्यालये बंद ठेवून सामान्यांना वेठीस धरणार्या संघटना 5 ऑगस्ट 2019 रोजी 370 वे कलम काढल्यानंतर नामशेष झाल्या आहेत. आता हळूहळू मात्र ठामपणे जम्मू काश्मीर विकासाच्या दिेशेने वाटचाल करित आहेत. असे उद्गार जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या जीवनावरील ‘लल्ला’ या अरूणा ढेरे यांनी लिहिलेल्या आणि सरहद ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले. सरहद संस्थेच्या पुढाकाराने जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव होऊ पाहणार्या आरागाम या बांदीपूरातील गावासाठी तसेच व्हॅली ऑफ नॉलेज या लोलाब खोर्याला ज्ञान खोरे बनविण्यासाठी होणार्या सर्व प्रयत्नांना शासन पूर्ण पाठींबा देईल असे आश्वासन देऊन त्यांनी सरहदच्या कामाचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी जम्मू काश्मीर मधील पुण्यात सरहद संस्थेत शिकणार्या काश्मिरी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कुठल्याही विकासासाठी शांतता महत्त्वाची असते. म्हणूनच युवकांनी जम्मू काश्मीर मधील शांततेसाठी आणि विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे. त्यांनी याप्रसंगी जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या बदलाचा आढावा घेतला.
आजच्या अशांततेमध्ये काश्मिरी संत कवयित्री ललेश्वरी यांचे विचार केवळ मार्गदर्शकच नाही तर शांतताप्रिय या समाजाला दिशा दर्शकही आहे. हे सांगतांना अरूणा ढेरे एका पंजाबी कवितेतील काही ओळी उधृत करून त्या म्हणाल्या, या पिढीच्या खांद्यावर प्रेते आणि हातात बंदूका कोणी दिल्या इतके भीषण वातावरण कोणी तयार केले. आम्ही तर याची पेरणी केली नव्हती. मग अशा काळात संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि लल्ला चा हात धरून पुढे जायचे आहे. या कार्यक्रमात सरहद संस्थेचे संजय नहार यांनी काश्मीरमधील पुस्तकाचे गाव ही कल्पना विनोद तावडे यांच्या पुस्तकाचे गाव यातून पुढे आली. याचा उल्लेख करून संस्थेने गुजरवाडी येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने नुकत्याच बांधलेल्या मुलींच्या वसतीगृहात काश्मीरमधील पोलीस आणि शहीद जवानांच्या मुलींना पाठविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी जाहीद भट तसेच अनुज नहार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि शीख समाजाचे नेते संतसिंग मोखा उपस्थित होते.
