पुण्यात पहिल्यांदाच सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये एबीओ- इनकम्पॅटिबल यकृत प्रत्यारोपण यशस्वी
पुणे – शेवटच्या टप्प्यावर असलेला यकृताचा आजार आणि हेप्टोसेल्युलर कार्सिनोमाशी (एचसीसी) लढत असलेल्या रुग्णांसाठी यकृत प्रत्योरोपण प्रक्रिया वरदान ठरली आहे. सामान्यतः यशस्वी प्रत्यारोपणासाठी डोनर आणि रिसीपियंट यांच्यात एबीओ जुळणे (कम्पॅटिबल) आवश्यक असते. मात्र, सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि मल्टी- ऑर्गन ट्रान्सप्लँट विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय टीमने एबीओ- जुळत नसतानही रुग्णावर यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण करत वैद्यकीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्रात सोलापूर येथे राहात असलेल्या ५२ वर्षीय रिक्षा चालकाला एचसीव्ही संसर्ग, सिरोसिस आणि एचसीसी (यकृताच्या कर्करोगाचा एक प्रकार) झाला होता. या आजारांवर मात करण्यासाठी त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. मात्र, एबीओ जुळत असलेले डोनर मिळणे कठीण जात होते. त्यावेळी नर्स असलेली त्यांची २५ वर्षांची मुलगी प्रत्यारोपणासाठी धाडसाने पुढे आली. खरं तर तिचा रक्तगटही वडिलांशी जुळत नव्हता. रुग्णाचा रक्तगट ओ प्रकारातील आहे, तर यकृत दिलेल्या मुलीचा रक्तगट ए प्रकारातील आहे.
विस्तृत शस्त्रक्रियापूर्व तयारी आणि मल्टी- डिसीप्लिनरी टीमच्या समन्वयानंतर एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले. विसंगत असलेल्या रक्तगटामुळे इम्युनच्या प्रतिक्रियेवर मात करणे हे प्राथमिक आव्हान होते. वैद्यकीय टीमने सर्वसमावेशक प्रत्यारोपणपूर्व इम्युनोसप्रेसिव्ह नियमावली तयार केली. त्यात इंजेक्शन देण्यापासून अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशी कमी करण्यापर्यंत व अँटी- ए अँटीबॉडीजना काढून टाकण्यासाठी प्लास्माफेरसिस सेशन्स, प्लास्माफेरेसिस व इम्युनोसप्रेसिव्ह औषधांपर्यंतचा समावेश होता.
शस्त्रक्रियेनंतरच्या देखरेखीत यकृत व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले. प्रत्यारोपणानंतर अवयव झिडकारला जाण्याची शक्यतेस इम्युनोसप्रेसिव्ह औषधांच्या मदतीने प्रतिबंध करण्यात आला. एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण क्रिया यशस्वी ठरली व रुग्णाचे यकृत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे शस्त्रक्रियेनंतरच्या देखरेखीत दिसून आले
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सह्याद्रि हॉस्पिटलच्या लिव्हर आणि मल्टी- ऑर्गन ट्रान्सप्लँट विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते यांनी मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “या विलक्षण शस्त्रक्रियेमुळे डोनर वर्गाची व्याप्ती वाढेल आणि मर्यादित डोनर्समुळे हतबल असलेल्या असंख्य रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होईल. एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपणास मिळालेल्या यशामुळे प्रत्यारोपण क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. अशाप्रकारचे नवीन तंत्र आणि इम्युनोसप्रेसिव्ह धोरणांमुळे या क्षेत्रात क्रांती येईल व पर्यायाने जीवरक्षक अवयवांच्या प्रत्यारोपणाची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना लाभ होईल.”
सह्याद्रि हॉस्पिटल नाविन्यपूर्ण तंत्रे आणि इम्युनोसप्रेसिव्ह धोरणांविषयी संशोधन करण्यासाठी बांधील असून त्यामुळे प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांती येऊ शकते. जीवरक्षक अवयवांच्या प्रत्यारोपणाची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना त्यामुळे चांगला लाभ होईल. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे एचसीसी किंवा यकृताचा आजार शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रुग्णांना नव्या भविष्याचे दरवाजे खुले झाले आहेत. यकृत प्रत्यारोपण प्रक्रिया त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
