Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारं असावं… शुभांगी गोखले यांनी व्यक्त केली भावना

स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं. प्रेमाची गोष्ट ही मालिका देखिल नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर,तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले.

प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र आणि अग्निहोत्र २ या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये मी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. आम्ही सगळे कलाकार खूप मिळून मिसळून काम करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाची आघाडी अश्विनी शेंडे आणि गौरी कोडीमला उत्तमरित्या सांभाळत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे.

या मालिकेत मी मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारं असावं असं मला वाटतं. त्यामुळे मी साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात कसं राहिल यासाठी माझा प्रयत्न असतो. या मालिकेत मी साकारत असलेलं पात्र शिस्तप्रिय आहे. साधेपणातलं सौंदर्य जपणारं आणि संस्कृतीशी घट्ट नाळ जपणारं. तेजश्री प्रधान आणि मी एका मराठी सिनेमात माय-लेकीची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा आम्ही दोघी मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलोय. तेजश्री उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करायला मला खूप आवडतं. अभिनयात खूप ठेहराव असणारी आणि सतत काहीतरी नवं शोधणारी तेजश्री मला खूपच भावते. हे पात्र आणि ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे अश्या शब्दात शुभांगी गोखले यांनी आपली भावना व्यक्त केली.’

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका प्रेमाची गोष्ट ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading