Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

सिस्टर डे निमित्ताने खुशबू ने दिले तितिक्षाला एक मोठं सरप्राईझ !

“सारं काही तिच्यासाठी” मालिकेचा पहिल्या प्रोमोपासूनच ह्या मालिकेची चर्चा होताना दिसतेय कारण आहे तगडी कलाकारांची फौज आणि ह्या मालिकेचं संगीत.  ही कथा आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. मैलोनमैल लांब असून सुद्धा त्याची नाळ एकमेकींशी जोडली आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेच्या प्रोमोशनच्या निमित्ताने खुशबू तावडे हिने सांगलीत हजेरी लावली.  तर दुसरीकडे खुशबूची लहान बहीण  तितिक्षा तावडे तीही  सांगलीत ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ह्या मालिकेच्या प्रोमोशनसाठी आलेली होती. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे या सिस्टर डे च्या निमित्ताने एकाच वाहिनीच्या एकाच कार्यक्रमात दोघी सख्ख्या बहिणी समोरासमोर आल्या. खुशबू ने तितिक्षाला सिस्टर्स डे च्या निमित्ताने एक प्रकारे गोड सर्प्राइझच दिले आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading